Breaking

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

महिला व विद्यार्थ्यींनीच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा उपयुक्त - प्रणिता रणजितसिंह शिंदे माढेश्वरी बॅंक सांस्कृतिक मंडळाने आ.शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण



महिला व विद्यार्थ्यींनीच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा उपयुक्त - प्रणिता रणजितसिंह शिंदे


माढेश्वरी बॅंक सांस्कृतिक मंडळाने आ.शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण


माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड



- माढा शहरातील माढेश्वरी बॅंक सांस्कृतिक मंडळ व माढेश्वरी महिला मंडळाच्या वतीने आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते ही बाब महिला व विद्यार्थ्यींनीच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी निश्चितच उपयुक्त असल्याचे असल्याचे मत आर्या पब्लिक स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता रणजितसिंह शिंदे यांनी व्यक्त केले आहे.



त्या माढेश्वरी अर्बन बँकेच्या सभागृहात रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अनिता भांगे होत्या.प्रास्ताविक नगरसेविका संजिवनी भांगे यांनी केले.
पुढे बोलताना प्रणिता शिंदे म्हणाल्या की, महिलांचा सर्वांगीण विकास झाल्यास देशाच्या विकासासाठी हातभार लागणार आहे.एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे करून सोडते त्यामुळे या पुरुषप्रधान संस्कृतीत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुण्या प्रणिता शिंदे, तालुकाध्यक्षा अनिता भांगे व नगरसेविका संजिवनी भांगे यांच्या हस्ते आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेतील यशस्वी महिला व विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र,भेटवस्तू व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. 
हा सांस्कृतिक उपक्रम माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत व माजी जि.प.सदस्य झुंजार भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय शहाणे, प्रसाद भास्करे,प्रताप शहाणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. 
या कार्यक्रमास माढेश्वरी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे,वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी,स्मिता शहाणे,शितल मस्के,आर्या शिंदे,स्वाती भांगे,पूजा सुरवसे,रूपाली भांगे,वैशाली अंबुरे, मेघा गोटे,कल्याणी ढेकळे,तेजस्विनी चव्हाण,अनिल कदम,बापू भांगे,सागर काळे यांच्यासह महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन डी.व्ही.चवरे यांनी केले. आभार रुपाली भांगे यांनी मानले.
फोटो ओळी- माढा येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना प्रणिता शिंदे व इतर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा