*तुळजापूर तालुक्यातील जळकोट वाडी येथे मृदंगाचार्य वैकुंठवासी विठ्ठल भैरू फंड यांच्या मासिका निमित्त समाज प्रबोधनात्मक किर्तन सोहळा संपन्न*
१६ सप्टेंबर रोजी जळकोटवाडी मध्ये निष्णात मृदुंगाचार्य वैकुंठवासी ह.भ.प विठ्ठल भैरू फंड यांच्या सहाव्या मासिकानिम्मीत ह.भ.प. मधुकर गिरी महाराज नान्नजकर यांचे समाजप्रबोधनात्मक विनोदी सुश्राव्य असा कीर्तन सोहळा पार पडला याप्रसंगी पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. या प्रसंगी गिरी महाराज यांनी भक्ती , जीवनमरणातील कर्म कर्तव्य यांच्यात सांगड कशी घालावी याचा उपदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून केला या कार्यक्रमाचे आयोजन समस्त फंड परिवार यांनी केले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा