हिरडगाव ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.सुनीता दरेकर यांची निवड...
प्रा.तुकाराम दरेकर सर यांच्या गटाची सरशी
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील हिरडगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी मध्ये 2021 मध्ये निवडणूक झाली होती खर तर ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी गावच्या नेतेमंडळी यांनी पुढाकार घेतला होता,
मात्र प्रा तुकाराम दरेकर सर यांचा विश्वासघात करत विरोधी गटाने
ही निवडणूक विश्वासघाताने जिंकली
होती, त्या मध्ये 7 जागा आंबदास दरेकर यांच्या गटाने जिंकल्या होत्या
तर प्रा.तुकाराम दरेकर यांच्या गटाला 2 जागा मिळाल्या होत्या, कालांतराने
विद्यमान सरपंच
सौ.संगीता भालचंद्र दरेकर यांना 3 अपत्य असल्याने त्यांना अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले होते, त्यावर सौ. संगीता दरेकर यांनी नाशिक आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते, दिनांक 20 ऑगस्ट 2021 पर्यंत आयुक्त यांनी अपात्रतेच्या निकालास स्थगिती आदेश दिला होता.
त्याची मुदत संपण्यापूर्वीच राजकीय दबावापोटी निवडणूक लावण्याची घाई प्रशासनाने केली होती,
राष्ट्रवादीचा एक नेता प्रशासनावर दबाव आणून अपात्र सदस्य हिला पात्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता.
मात्र विरोधी गटाचे चिमाजी आप्पाजी दरेकर व सौ सुनीता अनिल दरेकर
यांनी प्रा.तुकाराम दरेकर सर यांच्या कामाची जाणीव ठेवून
त्यांच्या गटात प्रवेश केला,त्यामुळे दरेकर गटाचे संख्या बळ 4 झाले होते. दोन्ही बाजूला 4-4 संख्याबळ झाल्याने चिट्ठी टाकून सरपंच पदाची निवड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यात
प्रा.तुकाराम दरेकर यांच्या गटाकडून सौ.सुनीता अनिल दरेकर
व दिपाली नाना दरेकर यांच्या चिठ्या टाकल्या गेल्या
त्यात
सौ.सुनीता अनिल दरेकर यांची चिट्ठी निघाली व गावात एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी
अमोल दरेकर, संपत दरेकर,
चिमाजी दरेकर, यांनी प्रा.तुकाराम दरेकर गटाच्या बाजूने व
विरोधी गटाकडून
योगेश दरेकर
दीपाली दरेकर
विद्या बनकर
जयश्री ससाणे यांनी भूमिका घेतली
यावेळी,
झुंबर दरेकर, दादा बनकर
मिलिंद दरेकर संतोष दरेकर
दत्तात्रय भुजबळ, बाळासाहेब दरेकर
संदीप दरेकर, विठ्ठल आबा दरेकर
संपत अण्णा दरेकर, पोपट ढवळे
रामदास दरेकर, परशुराम भुजबळ
दत्तात्रय दरेकर, भाऊसाहेब पाटील
व नागरीक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
चौकट-
ज्यांनी प्रा.तुकाराम दरेकर सर यांचा विश्वासघात करून त्यांना फसवले त्यांच्या पश्चात त्यांच्या पार्टीला कुणीही वाली नाही अशा वलग्ना केल्या गेल्या त्यामुळे या सर्व प्रक्रियेत जातीने भूमिका घेत अपात्र सदस्याला पात्र करण्याचा राष्ट्रवादी च्या नेत्यांचा व तहसीलदार व प्रशासन यांचा डाव उधळून लाऊन नानांस अनोखी श्रद्धांजली वाहिली अशी प्रतिक्रिया
श्री.बाळासाहेब नाहाटा व टिळक भोस यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा