*सुळेवाडी येथील विठ्ठल दयाजी मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 41 जणांचे रक्तदान*
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील विठ्ठल दयाजी मंडळातर्फे गणेशोत्सवानिमीत्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये 41 जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उदघाटन सहहयाक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिलीव औट पोस्टचे ठाणे अमंलदार पंडीत मिसाळ, शिवाजी विरकर, शिवराज पुकळे, मंडळाचे संस्था पक विठ्ठल सुळे,अण्णा सुळे ,अध्यक्ष शिवराम माने ,उपाध्यक्ष युवराज रुपनवर व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर राजु सुळे,बाजीराव सुळे, संतोष सुळे, लक्ष्मण सुळे, नाथा सोलंकर, योगेश माने ,विठ्ठल सोलंकर, महादेव सुळे,यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी सहहयाक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरे, वुक्षारोपण,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबवावेत .सध्या कोरोनाचा काळ असुन यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे यामुळे हया मंडळाने राबविलेला उपक्रम अतिशय चांगला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सदर रक्तदान शिबीर सुळेवाडी येथील विठ्ठल दयाजी सामाजिक मंडळ व विक्रम सुळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवा नेते विक्रम सुळे यांनी या मंडळाच्यावतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप,कोरोनाच्या काळात गोरगरिबांना धान्य वाटप,यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे विक्रम सुळे यांनी सांगितले. रक्त संकलन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज यांनी केले.
फोटो - सुळेवाडी येथील रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करीत असताना ठाणे अमंलदार पंडीत मिसाळ.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा