उस्मानाबाद जिल्ह्यातील वय वर्ष 2 ते 18 वयोगटातील लसीकरण प्रभाग निहाय घ्यावे, या मागणीसाठी, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
आज दिनांक 24 सप्टेंबर 2021,रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,लवकरच देशाचे भावी उज्जवल भवितव्य ठरणाऱ्या वय वर्ष 2 ते 18 वर्ष वयोगटातील लसिकरन मोहीम सुरु होणार आहे,आणि मोहीम सर्वात महत्वाची आसनार आहे, गेली दोन वर्ष झाले कोरोनाच्या संकटा मुळे शाळा काँलेज बंद आहेत त्या मुळे या दोन वर्षात मोठ्या प्रमानात शैक्षणीक नुकसान झालेले आहे . त्या मुळे बरेच बालके शैक्षणीक प्रवाहातून बाहेर पडलेले आहेत ,त्यांना परत ऐकदा शैक्षणीक प्रवाहात आनण्या करीता लवकरात लवकर शाळा सुरु होने आत्यंत गरजेचे आहे त्या साठी लसिकरन मोहीम वेगाने होने आत्यंत गरजेचे आहे ,सध्या 18 वर्षाच्या वरील सर्व नागरीकांची लसिकरन मोहीमेचा वेग प्रभाग निहाय सुरु केल्या नंतरच वाढलेला दिसून येतो त्या मुळे ही लसिकरन मोहीम प्रभागा निहाय घेतली तर ती सुलभ व जलद होईल . सध्या साथ रोगाची साथ मोठ्या प्रमाणात आसल्याने तुळजापूर उपजिल्हा रुग्नालयात रुग्न संख्या मोठ्या प्रमाणात आसल्याने त्या ठिकाणी लसिकरन घेने म्हणजे साथ रोगाला आमंत्रण ठरेल,त्या मुळे हे लसिकरन प्रभाग निहाय घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, या निवेदनावर इंद्रजीत साळुंखे, बाळासाहेब भोसले, प्रसाद पाणपुडे, यांच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा