Breaking

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

निढळच्या जीवनज्योती व जीवनसाथीचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.




निढळच्या जीवनज्योती व जीवनसाथीचा पूरग्रस्तांना मदतीचा हात. 


वडूज प्रतिनिधी / शरद कदम

 मानवतेच्या भावनेतून निढळ ता.खटाव येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जीवन ज्योती व जिवनसाथी महिला ग्रामसंघातील या दोन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना धान्य व कपडे साहित्याची वाटप पाटण तालुक्यातील दुर्गम भागात देण्यात आले.
           पाटण तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसाने डोंगर खचून मोठ्या प्रमाणात भूसख्खन झाले आहे. कोकणेवाडी, आटोली-पाचगणी, मोरगिरी याठिकाणी अतिवृष्टीने जीवित व वित्तहानी झाली. या पूरग्रस्त भागातील बाधितांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निढळ ता.खटावच्या जीवनज्योती व जीवनसाथी महिला ग्रामसंघ यांच्या वतीने गहू, तांदूळ, ज्वारी, मुगडाळ, कपडे, साडया, खाद्यपदार्थ आदीसह जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
      यावेळी जीवनज्योती महिला ग्राम संघाचे अध्यक्षा सुनिता संतोष खुस्पे, सचिव सुषमा बापूराव काटकर, कोषाध्यक्षा शबाना नासीर शेख व जीवनसाथी महिला ग्राम संघाच्या सचिव अश्विनी दळवी, पूजा ज्ञानेश्वर वसव, माधुरी शशिकांत दळवी, कोमल अनिल वसव व संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून संघटनेच्या माध्यमातून सर्व महिल्या पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. सदरची मदत स्वतः महिला वर्गाने पाटण येथे जाऊन दिली. या कामगिरीबद्दल निढळ परिसरातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा