*वृद्धाश्रम हा आनंदाश्रम व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
समाजातील निराधार व वृद्धांसाठी केडगाव (ता.करमाळा) येथील नियती संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नवजीवन वृद्धाश्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.आयुष्याच्या मावळतीला निघालेल्या जेष्ठ नागरिकांना उगवतीचा आनंद मिळावा,त्यांचे जगणे आणि वागणे स्वाभिमानाचे आणि मायेचे असावे. वृद्धाश्रम हा आनंदाश्रम व्हावा,असे मत यशकल्याणी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.
ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळेस नायब तहसीलदार सुभाष बदे आणि युवानेते शंभुराजे जगताप,बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथील आजोळ परिवाराचे कर्नवीर तांबे, यांची मार्गदर्शनपर भाषणे संपन्न झाली.यावेळेस व्यासपीठावर आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे केडगावचे सरपंच वर्षा पवार यशवंत क्लासेसचे प्रा. जयेश पवार ,पत्रकार गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे,करमाळा व्यसनमुक्ती संघाचे अध्यक्ष रामराजे वाघमोडे,पांडे ग्रामपंचायतचे सदस्य भिवा वाघमोडे अदि मान्यवर उपस्थित होते. नियती संस्थेचे अध्यक्ष विजय बोराडे,दत्तुबळी बोराडे,सचिन बोराडे, सुर्यकांत केदार, माऊली पालखे, व इतर सदस्यांच्या प्रयत्नातून या वृद्धाश्रमाची निर्मिती झाली आहे.
समाजाप्रती असलेल्या समर्पित भावनेतून स्नेहल बोराडे या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन पहात आहेत. मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले,एवढेच नाही तर योग्य प्रकारे मदत करू असे आश्वासनही दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका स्नेहल बोराडे यांनी केले,नागनाथ गटशेती संस्थेचे संचालक गजेंद्र पोळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर शुभम बोराडे यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा