Breaking

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीस मिळाली सायकल,सारोळा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांचा पुढाकार,घरपोच केली सायकल; अक्षराची इच्छा पूर्ण!


वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीस मिळाली सायकल,
सारोळा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांचा पुढाकार,
घरपोच केली सायकल; अक्षराची इच्छा पूर्ण!


उस्मानाबाद: वडिलांविना पोरक्या झालेल्या अन् गरिब परिस्थितीमुळे सायकलही घेवू न शकलेल्या वाघोली (ता.उस्मानाबाद) येथील अक्षरा बापू मगर हिला सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी स्वखर्चातून सायकल उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी (दि.३) वाघोलीतील तरूणांच्या हस्ते अक्षराला ही सायकल सुपूर्द करण्यात आली.



वाघोली येथील बापू मगर यांचे एक महिन्यापूर्वीच निधन झाले होते. घरची स्थिती बेताचीच. एकमेव कर्ता पुरूषच गमावल्याने कुटूंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. तर एका मुलासह दोन मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. यातील १० वर्षिय अक्षराने सायकल घेण्याची आईकडे मागणी केली. मात्र पैशाअभावी सायकल घेता आली नाही. याची माहिती सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांना मिळताच त्यांनी तत्काळ सायकल खरेदी करून वाघोली येथील तरूणांच्या मार्फत मंगळवारी (दि.३) अक्षराकडे सायकल सुपूर्द केली. सायकल पाहून अक्षराच्या चेहऱ्यावर हासू उमटले होते. यावेळी श्रीधर मगर, राहुल खडके, स्वप्नील मते, साजिद शेख, सुरज सुलाखे, असिफ सय्यद, प्रकाश मगर, अमोल खडके, मनोज काकडे, सुजित लुंगसे, तुकाराम मगर, इरफान मुजावर, काका मगर, मिटू मगर आदींसह परिवारातील सदस्य उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा