माळेवाडी बोरगाव येथील घटनेतील आरोपीना तात्काळ अटक करा
..................................................
भिम-अण्णा सामाजिक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
.................................................
तुळजापूरः ता.२३
सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील मौजे माळवाडी(बोरगांव) येथील मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे दि.२०/०८/२०२१ रोजी रात्री २.०० वाजता निधन झाले होते. परंतु गावातील जातीवादी व गुंड प्रवृत्तीच्या समाज कंठकांनी त्यांचा
अंतविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास विरोध केला आहे.सदरील घटना अनाकलनीय तसेच भागास जातीस दडपण्याचे भ्याड कृत्य आहे.एवढेच नाही तर गावातील संबंधीत दुकानदारांणा अंत्यविधीस लागणारे साहित्य देण्यास मज्जाव करणाऱ्या सर्व गाव गुंडांवर कायदेशीररित्या कारवाई व्हावी.अशा आशयाचे तुळजापूर तालुका भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या च्या वतीने (दि.२३)रोजी नायब तहसीलदार श्री.शिंदे यानां निवेदन देऊन तीव्र निषेध केला
आहे.
संबंधित घटनेतील गांव गुंडावर अॅट्रासिटी ऍक्ट कायदयांन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा व त्वरीत अटक करावी, तसेच पिडीत कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भिमअण्णा सामाजिक सघटना वतीने देण्यात आला आहे.निवेदनावर किसन देडे, जयराम क्षीरसागर,सुरेश मस्के,कृष्णा डोलारे,दिपक शिंदे,आकाश शिंदे,अभिमान सगट आदी प्रमुख पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा