*सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानाचा बुधवारी हलगीनाद*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यात सुरू असलेली वीज वितरण कंपनीची सक्तीची वीजबिल वसुली त्वरित थांबवावी तसेच बंद केलेली वीज पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी जेऊर येथे हलगीनाद आंदोलन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ यांनी दिली.
तहसीलदार करमाळा यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
25 ऑगस्ट ,बुधवारी जेऊर सबस्टेशनवर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे ,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश डोंगरे आदी उपस्थित होते. तमाम शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा