उजनी तून उजवा व डावा कालव्यात सुटणार पाणी- आ.बबनदादा शिंदे
सोलापूर जिल्ह्यात सध्या पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे शेतीसाठी उजनी धरणातून उजवा व डावा कालव्यातून उद्या पासून पाणी सोडणेत येणार असल्याची माहीती AJ 24 Taas News ला आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
सविस्तर AJ 24 Taas ला माहिती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सध्या पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे उजनीचा डावा व उजवा कालवा यावर अवलंबून असणा-या लाखो एकर क्षेत्रातील खरीप पिके व फळबागा पाणी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. नुकतेच उजनी धरण उणे 9 टक्क्यावरून उपयुक्त पातळीत आले आहे तसेच उजनी धरणात सध्या 62 टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे तसेच उजनी धरणात भविष्यकाळात पाणी येण्यासाठी अद्याप दीड ते दोन महीन्याचा पावसाळा बाकी आहे. त्यामुळे उजवा व डावा कालव्यातून शेतीला पाणी तातडीने देण्यात यावे. अन्यथा लाखो एकर क्षेत्रातील ऊस,फळबागा,खरीप पिके व चा-याची उभी पिके पाण्याअभावी जळून जाऊन शेतक-यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होईल.तसेच पिण्यासाठी व विविध पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत राहणेच्या दृष्टीने देखील पाण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आ.बबनराव शिंदे यांनी जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे केली. या मागणीनुसार उजनी धरणातून उजवा व डावा कालव्यातून उद्या पासून पाणी सोडणेबाबत सकारात्मकता दर्शवित उद्यापासून पाणी सोडणेसाठी संबंधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत अशी माहीती आ.शिंदे यांनी दिली.
सध्या उजनी धरणातील पाण्याची पातळी 494.990 मीटर असून एकुण साठा 2748.78 द.ल.घ.न.मी. असून उपयुक्त पाणी साठा 945.97 द.ल.घ्.न.मी.आहे. सध्या धरणात 62 टक्के पाणीसाठा आहे. या सर्व अनुकुल परिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
उजनी धरण पाणी पातळी
दि :14/08/2021
सकाळी 08.00वा
पाणी पातळी : 494.985
एकूण साठा : 2747.35
उपयुक्त साठा : 944.54
टक्केवारी : +62.26%
बंडगार्डन विसर्ग : 2551
दौंड विसर्ग :2717
कालवा :
बोगदा :150
नदी :
वीज निर्मिती :
पाऊस :10मी.मी.
एकूण पाऊस: 264मी.मी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा