Breaking

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

रांझणी-भिमानगर या ग्रामपंचायतीने पाच दिवसाचा कर्फ्यू केला जाहीरवाढत्या कोरणा रुग्णसंख्या मुळे ग्रामपंचायतीने घेतला निर्णय



रांझणी-भिमानगर या ग्रामपंचायतीने पाच दिवसाचा कर्फ्यू केला जाहीर
वाढत्या कोरणा रुग्णसंख्या मुळे ग्रामपंचायतीने घेतला निर्णय


भिमानगर प्रतिनिधी 


प्रदीपराव पाटील

रांझणी-भिमानगर तालुका माढा या ग्रामपंचायतीने कोविड कमिटी (कोरोणा प्रतिबंधक समितीने) 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान पाच दिवसांच्या कालावधी करिता जनता कर्फ्यू लागू केला आहे.वाढत्या कोरोणा संसर्गाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मा. कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर व रांझणी भिमानगरच्या सरपंच सौ सोनाली पांडुरंग माने यांनी सांगितले.

रांझणी येथे ग्रामपंचायतीने गेली सहा महिने झाले कोविड सेंटरची उभारणी केली असून आतापर्यंत बरेच कोविड पेशंट या ठिकाणी बरे झाले असून अजूनही पेशंट या ठिकाणी उपचार घेत आहेत रांझणी कोविड सेंटरला 4000 कोविड रॅपिड टेस्ट किट व 800 आरटीपीसीआर किट उपलब्ध झाले असून नागरिकांनी लक्षणे दिसताच आपली तपासणी याठिकाणी मोफत तपासणी रांझणी येथील कोविड सेंटरमध्ये करून घ्यावी व या कोवीड सेंटरचा कोंडार भागातील नागरिकांनी लाभ घ्यावा असेही संजय पाटील भिमानगरकर यांनी सांगितले.

रांजणी-भिमानगर या गावात गेली 10 ऑगस्टपासून बारा पेशंट सापडले असून त्यापैकी दोन पेशंट मयत झाले आहे.त्या अनुषंगाने रांझणी भिमानगर या गावांमध्ये जनता कर्फ्यूची गरज असल्याचे आलेगाव येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर नेहा देशमुख यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा