*पुरग्रस्तांनसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नायगाव मध्ये मदत रॅली संपन्न.*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
*नायगाव* :- राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात जीवित व नैसर्गिक हानी झालेली आहे.संकट काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणे होय.याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे *हात मदतीचा* हे अभियान नायगाव येथे *राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष भास्कर पा.भिलंवडे* यांच्या नेतृत्वाखाली मदत फेरी नायगाव शहराच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली.
यावेळी नैसर्गिक आपत्तीतीतून सावरण्यासाठी बाजारपेठेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सढळ हाताने मदत केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्याची मदत एकत्रित करून जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाच्या माध्यमातून पिडीत पुरग्रस्तांन पर्यत पोहचवली जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे यांनी कळविले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वसंत सुगावे पाटील,श्यामराव पा. चोंडे, विश्वनाथ पा. बंडूरे,गजानन पाटिल होटाळकर,मारोती कदम,माधव कोरे,अमोल जाधव,कैलास पा. जाधव,साहेबराव पा. कांडाळकर,जगण जाधव,मारोतराव वड्डे, जळबा सूर्यवंशी,गोविंद पा. कवळे, माधवराव बेंद्रीकर,अंबादास गोरे,राजू सूर्यवंशी,सुधाकर कोकणे,दशरथ इरेवाड,अखिल चोंडे यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा