मुख्याध्यापिका कलावती पाटील सेवानिवृत्त संस्थेमुळेच मी खंबीरपणे उभी राहू शकले - कलावती पाटील
पेण /प्रशांत पोतदार
पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कलावती पाटील आज वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या.यावेळी या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ऍड मंगेश नेने, कार्याध्यक्ष वसंत आठवले, खजिनदार संजय कडू, सचिव प्रशांत ओक, संचालक सुधीर जोशी, दिलीप बापट, ललित पाटील, किरण देव, ज्योती राजे, शंकर भट, दिगंबर चिंचणीकर, पूनम शहा, डॉ नीता कदम, नगरसेविका तेजस्विनी नेने, वावोशी च्या मुख्याध्यापिका विद्या घरत, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका पटवर्धन मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकी पेशात ३४ वर्षे पूर्ण केल्यानंतर मुख्याध्यापिका कलावती पाटील आज सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या या सेवानिवृत्ती बाबत आज पेण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांनी सेवपूर्ती सोहळा आयोजित केला होता. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका कलावती पाटील यांनी आपल्या बालपणापासून ते शिक्षक सेवेतील आनंदी आणि कटू अशा दोन्ही प्रकारच्या आठवणी सांगताना संस्थेने दिलेले प्रेम, माझ्यावर टाकलेला विश्वास या गोष्टी मी कधीच विसरू शकणार नाही, त्यांनी दिलेला आत्मविश्वास आणि मार्गदर्शन यामुळेच मी या ठिकाणी खंबीरपणे उभी राहू शकली.त्यामुळे मी या संस्थेला कधीच विसरणार नाही असे सांगितले, तर पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड मंगेश नेने यांनी अशा मुख्याध्यापिका मी पहिल्यांदाच पहिल्या आहेत की त्यांच्या कारकिर्दीत एकाही विद्यार्थ्यांची किंवा एकाही पालकाची तक्रार माझ्याकडे आली नाही, त्यामुळे या मुख्याध्यापिकांचा काम कसा असेल हे सहज स्पष्ट होत असून जरी आज त्या सेवा निवृत्त झाल्या असतील तरी शाळेमध्ये जमेल त्या वेळेला येऊन आमच्या शिक्षकांना मार्गदर्शन करावे असे सांगून कलावती पाटील यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत आठवले, खजिनदार संजय कडू, पेण पालिकेच्या नगरसेविका तेजस्विनी नेने,शिक्षिका कमल पाटील यांनी कलावती पाटील यांच्या कार्यालालबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका लेखा ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन सुषमा साखरे आणि आभार अपर्णा वाघमारे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा