अकलूज नगरपरिषद व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होण्यासाठी राज्यपालांना निवेदन
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा असणाऱ्या मोहिते-पाटील घराण्याची कर्मभूमी असलेल्या अकलूज, माळेवाडी (अकलूज) या ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे या मागणीसाठी राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.
अकलूज येथे नगरपरिषद व नातेपुते येथे नगरपंचायत झाल्यास जिल्ह्यातील नगरसेवकांची संख्या वाढणार असून त्याचा परिणाम येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीवर होणार असल्याने या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस,महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुते ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल पाटील,मामा पांढरे, जालिंदर फुले हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा