*सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई येथे ग्रामपंचायतीच्या विविध मागण्याचे, ग्रामविकास मंत्री हसन मुषरिफ साहेब, व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले,*
दिनांक १४ जुलै २०२१, रोजी, सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामपंचायत च्या विविध मागण्या चे ग्रामविकास मंत्री व सहकारमंत्री यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,ग्रामपंचायत थकीत बिले भरणे बाबत विषयी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य आपणास विनंती करते की पंधराव्या वित्त आयोगाचे अंतर्गत केंद्र सरकारने ग्रामपंचायत करिता ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामासाठी निधी दिला आहे, सदरील निधीच्या खर्चाचे नियोजन ग्रामपंचायतीने वार्षिक आराखडे तयार करून काही प्रमाणात खर्च सुद्धा केलेले आहेत, त्यामध्ये बहुतांश निधी विकास कामे व कोरोणा उपाय योजनेवर खर्च झाला आहे, आराखड्यातील मूलभूत व पायाभूत असलेली अत्यंत गरजेचे कामासंदर्भात सदरील आराखडे मंजूर झालेले आहेत, व ती कामे करणे गरजेचे आहे, परंतु राज्य शासनाने आतापर्यंत ग्रामपंचायत ने कधीही न भरलेली स्ट्रीट लाईट बिल जे की राज्य सरकार भरत असते, अशी वीज बिले 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या वतीने भरण्याचे आदेश राज्य सरकारने काढलेले आहेत, सदरील हे आदेश ग्रामपंचायतीच्या अधिकारावर घाला घालणारे असून, ते अन्यायकारक आहेत, आत्तापर्यंत ग्रामपंचायतीकडे कोरोना काळामध्ये कुठलाही कर संकलन व इतर निधी उपलब्ध न होऊ शकल्याने सद्यस्थितीत तरी ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटची बिले भरण्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, आगामी काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियोजन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, तरी सदर विषययास हस्तक्षेप करून ग्रामपंचायत वर होणारे अन्याय थांबून न्याय भूमिका घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर, अध्यक्ष जितेंद्र भोसले, ज्ञानेश्वर वायाळ, कोहिनूर सय्यद, शंकर खापे, तसेच सरपंच परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजित हंगरकर,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा