*तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील रोडचे व बंधाऱ्यांचे काम करण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवेदन*
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,गेल्या आक्टोबर २०२० मध्ये कात्री ता तुळजापूर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.आपण सर्वांत आधी भेट देऊन पाहणी केली, संपूर्ण डांबरी रस्ता खरडून शेतीचे तसेच द्राक्ष कांदा सोयाबीन एवढेच नव्हे तर विहीरी सुध्दा गाळाने भरल्या, मुख्यमंत्री साहेब,शरद पवार साहेब, राजू शेट्टी साहेब, छत्रपती संभाजी राजे, कित्येक खासदार, आमदार अख्ख्या मंत्री मंडळाने पाहणी केली आढावा घेतला, पण अद्याप पर्यंत ना रोडचे काम केले नाही,ना वीमा मिळाला नाही,ना ठिबक सिंचनाचे अनुदान नाही,ना चालू कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार दिले नाहीत, बॅंका कर्ज देत नाहीत, आम्ही वारंवार जिल्ह्याधिकारी यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार यांना पण वेळोवेळी या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले पण कुणीच याची दखल घेतली नाही, कारण एकच सांगितलं जातंय कोरोनामुळे पैसा नाही, पण मंत्री खासदार, आमदार, नोकरदार यांच्या पगारी थांबल्यात का, शेतकऱ्यांना देताना फक्त महामारी आठवते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, हे निवेदन खासदार ओम राजे निंबाळकर यांना देण्यात आले, या निवेदनावर
रविंद्र इंगळे. धनाजी पेंदे
जिल्हा. उपजिल्हा
अध्यक्ष. अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना उस्मानाबाद
नेताजी जमदाडे. दुर्वास भोजने
अध्यक्ष. अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना तुळजापूर
प्रदीप जगदाळे
शहर अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना तुळजापूर
पदाधिकारी व कार्यकर्ते
संजय भोसले,उमेश जमदाडे,
मुकेश भोसले, ज्ञानेश्वर जमदाडे, यांच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा