Breaking

बुधवार, १४ जुलै, २०२१

छत्रपती संभाजीराजे वसतिगृहाकडे जाण्यासाठी सीसी रस्त्याला निधी उपलब्ध करून द्या-खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे मारुती दिवसे यांची मागणी



छत्रपती संभाजीराजे वसतिगृहाकडे जाण्यासाठी सीसी रस्त्याला निधी उपलब्ध करून द्या-


खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे मारुती दिवसे यांची मागणी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट,गोकुंदा येथील मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती संभाजीराजे यांचे नावे असलेल्या वस्तीगृहाकडे जाण्यासाठी सीसी स्त्याला निधी मिळणे संबंधी खा.हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे शिवसेना किनवट तालुका समन्वय मारोती दिवसे यांनी मागणी केली आहे.

किनवट नांदेड रोडवर गोकुंदा येथे परिसरातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी येथे मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती संभाजीराजे वसतिगृहाची निर्मिती केली असून विद्यार्थ्यांना तसेच आजूबाजूच्या लोकांना व बाजूलाच असलेल्या इंडिरा गांधी शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी तसेच नागरिकांना त्रास होत आहे.या वसतिगृहाकडे जाण्यासाठी अंदाजे पंधरा लक्ष रुपये निधी बांधकामासाठी दलित वस्ती आदिवासी विकास ठक्कर बाप्पा मधून मिळवून शैक्षणिक सोय करून द्यावी अशी विनंती मा.खासदार श्री हेमंत भाऊ पाटील यांच्याकडे शिवसेना किनवट तालुका समन्वय मारोती दिवसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा