राम पवार मित्रपरिवारच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
राम पवार मित्रपरिवारच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न
टेंभुर्णी येथे राम पवार मित्रपरिवारच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रुग्णांवर पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर, पुणे, संचलित नेत्र तपासणी केंद्र, टेंभुर्णी यांच्या सहाय्याने पुणे येथील डॉ.लगत शेंडगे यांनी रुग्णांची तपासणी केली.
आजच्या वेगवान जीवनशैलीत जगभरात ३९० लाख अंध लोक आहेत. त्यापैकी १२० लाख अंध लोक भारतात असून. ७० ते ७५ टक्के नेत्र दोष योग्य वेळेत उपचार केल्यास बरे होऊ शकतात. अंधत्व येण्याच्या मुख्य कारणांमध्ये अनेकांना मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या मुख्य कारण आहेत.हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी नेत्र तपासणी केंद्र,टेंभुर्णी आणि राम पवार मित्र परिवार यांनी सत्संग भवन वडार गल्ली टेंभुर्णी येथे या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ६७ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.
हे शिबिर पार पडण्यासाठी दीपक पवार, कृष्णा धोत्रे, योगेश पवार, आकाश जगताप, बाबा पवार, विकास सुर्वे, सचिन पवार, समीर नाईकनवरे, प्रेम धोत्रे, विशाल पवार, सुरज जाधव, सज्जन पवार, राहुल धोत्रे, बालाजी जगताप, भाईजान मुलाणी, मोसिन शेख, अजय टिपाले, ऋषिकेश मुंजाळ, टिंकू किर्ते, सोमनाथ शिंदे, ज्योतीराम माने, अक्षय मोठे, कैलास नाचन, सुरज पवार, पिंटू जगताप, अजय आरडे, संतोष शिंदे, अर्जुन धोत्रे, शंकर चंदनशिवे शिंदे, नाना चौगुले आदींनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा