*वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मनमानी कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी... अन्यथा उपोषण.. शहाजीराजे गोडसे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मनमानी कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी तसेच वडूज पोलीस स्टेशनचे कर्मचारी अण्णा मारेकरी याच्यावर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे.
या निवेदनातील अधिक माहिती अशी की, वडूज पोलीस ठाण्यातील कर्मचारी मारेकर हे वडूज शहरातील महिला, शेतकरी, व्यापारी, व नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून उद्धट वर्तन करून त्रास देत आहेत. तसेच दारूच्या नशेत रात्री अपरात्री दुकानदारांना पैशाची मागणी करत जीवघेणी हल्ला करण्याचा प्रयत्न ही केला आहे. तसेच पाठलाग करणे, अपहरण करणे असले उद्योग त्यांनी केले असल्याबाबतचे निवेदन आम्ही दिले होते. याप्रकाराची चौकशी ही झाली आहे मात्र अद्याप त्या मारेकर याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्याच्यावर त्वरित कारवाई करावी. त्याच बरोबर अशा कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांची खातेनिहाय चौकशी करावी.
तसेच एपीआय देशमुख यांनी बैलगाडी शर्यत, जुगार अड्ड्यावर छापा, अनेक वर्षपूर्वी प्रकरणे घडल्याचे दाखवून त्याला गुन्ह्याचे स्वरूप देऊन फिर्यादी तयार करून गुन्हे दाखल करणे, तसेच काही गुन्ह्यातील काही आरोपींकडून आर्थिक तडजोड करून व्हीआयपी ट्रीटमेंट देणे यासह अनेक प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे निवेदन जिल्हापोलीस प्रमुख यांना दिले आहे. तरी या वर अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसून येत्या चार पाच दिवसात कार्यवाही न झाल्यास मंगळवार दि. २९ रोजी वडूज तहसील कार्यालय येथे उपोषण करणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
चौकट : न्यायालयात दाद मागणार....
यांच्यावरील चौकशी साठी आम्ही उपोषण करणार आहोतच परंतु यातील काही प्रकरणे गंभीर स्वरूपाची आहेत. त्यासाठी आम्ही स्वतंत्र न्यायालयात दाद मागणार आहोत असे ही ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
फोटो ओळी : उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देताना नगरसेवक शहाजीराजे गोडसे, विजयदादा शिंदे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा