*प्रा.संदीपान गुटाळ यांची मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हा सचिव पदी निवड*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद ,नवी दिल्ली या संस्थेच्या जिल्हा सचिव पदी पांगरे ता. करमाळा येथील प्रा. संदीपान गुटाळ यांची निवड करण्यात आली आहे.
मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी ही संस्था देशपातळीवर कार्यरत असून प्रा . संदीपान गुटाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचे प्रा गुटाळ यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील दिन,दुबळ्या, गरीब समाजाच्या हक्कांसाठी आपण लढत राहणार आहोत.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन, करमाळा तालुका मराठा सेवा संघातर्फे त्यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिव सचिन शिंदे, स
स्वाभिमान संघटना जिल्हाध्यक्ष संजय गुटाळ, इंग्लिश स्कूल संस्थापक सुहास काळे, बीपीनशेठ सोनी, संतोष केसकर,राजकुमार राऊत, पांडुरंग भगत, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा सुनील शिंदे, प्रा. युवराज सातव टायगर ग्रुपचे गहिनीनाथ गुंजाळ आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा