Breaking

शनिवार, ५ जून, २०२१

तुळजापूर शहराच्या विकासासाठी दिलेला विकास निधी योग्य कामासाठी खर्च करावा... अन्यथा चौकशी..विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे.



*तुळजापूर शहराच्या विकासासाठी दिलेला विकास निधी योग्य कामासाठी खर्च करावा... अन्यथा चौकशी..विधानसभा अध्यक्ष  गोकुळ शिंदे,*
****************************** 

 तुळजापूर शहराच्या विकासासाठी दिलेला निधी अंदाजपत्रक इस्टिमेट प्रमाणे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता योग्य त्या कामासाठी खर्च करावा या बाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन*

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सुरु असलेल्या विकास कामे दर्जेदार व निधी योग्य पद्धतीने,भ्रष्टाचार न करता वापर करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने कामाची गुणवत्ता चौकशी समिती नेमून करेल असे मुख्याधिकारी लोकरे यांना निवेदनद्वारे देण्यात आले. यावेळी तुळजापूर विधानसभा अध्यक्ष श्री गोकुळ शिंदे,दिलीप मगर,शहराध्यक्ष अमर चोपदार,कार्याध्यक्ष गोरख पवार,युंवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम,युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, महेश चोपदार,युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, जिल्हा सरचिटणीस शशी नवले,जनक कदम-पाटील, दिनेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा