Breaking

शुक्रवार, ७ मे, २०२१

पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कोरोना ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार मिळावेत-डॉ कैलास गोरे-पाटील


पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कोरोना ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार मिळावेत-डॉ कैलास गोरे-पाटील
उजनी प्रतिनिधी/संतोष पाटील

 महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस जपाट्याने वाढत असून शासनाने पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कोरोना ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार करावेत अशी मागणी जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष डॉ कैलास गोरे-पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व शरदचंद्र पवार यांना लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

 गेल्या वर्षापासून महाराष्ट्रातील संपूर्ण जनता कोरोना महामारी मुळे त्रस्त आहे . वेळोवेळी केलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे . अशातच सर्व खाजगी रुग्णालयामध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक पिळवणूक झालेली आहे .भरमसाठ विविध प्रकारच्या अनेक महागड्या तपासण्या , महागडी औषधे , आयसीयू च्या नावाखाली प्रचंड हॉस्पिटल चार्जेस , नरसिंग चार्जेस , ऑक्सीजन चार्जेस , इत्यादी . एकंदरीत प्रत्येक पेशंट चे हॉस्पिटल बिल लाखोच्या घरात झालेले आहे . जनता कोरोना पेक्षा हॉस्पिटल खर्चास प्रचंड धास्तावली आहे . वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व हॉस्पिटल चालक यांनीदेखील सहानुभूतीपूर्वक विचार करावा . आपणच आपल्या लोकांना सहकार्य करून या महामारी तून बाहेर काढावे . सरकारी नियमाप्रमाणे डॉक्टर्स , नर्सेस , प्यारा मेडिकल स्टाफ यांना कोरोना मानधन देऊन जनतेची सेवा करण्याची विनंती करावी.असे केल्यास सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठा मानसिक आधार मिळेल . आणि लवकरच महाराष्ट्र एकजुटीमुळे कोरोना मुक्त होईल . तरी कृपया या विनंतीचा गांभीर्याने विचार करावा .अशा आशयाचे निवेदन कैलास गोरे पाटीलयांनी मा. श्री शरद चंद्रजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाटवल्या आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा