Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांवरचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय वापरून व्यवसायास परवानगी द्या- बाळासाहेब करचे*.



*मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांवरचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय वापरून व्यवसायास परवानगी द्या- बाळासाहेब करचे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

      संपूर्ण राज्यात कोरोना मुळे सरकारने लॉकडाउन शब्दाचा वापर टाळत टाळेबंदी केली आहे .ती मध्यमवर्गीय व कष्टकरी वर्गासाठी खूप अडचणीची ठरत आहे.त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी देण्याची मागणी समाजसेवक बाळासाहेब करचे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
     या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या आधी सरकारने केलेली टाळेबंदी मरणाच्या दारातून परत घेऊन आलेली असताना आता पुन्हा होणारा बंद हा व्यापारी वर्गासाठी खूप जाचक आहे 
अनेक व्यापारी हे भाडोत्री जागेत व्यापार करतात अनेक व्यापारावर जगणार कष्टकरी वर्ग बाजार पेठ बंद झाली की रोजगराला मुकतो अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल आणलेला आहे लाईटबील रोजचा प्रापंचिक खर्च एक ना अनेक अडचणी समोर आहेत 
सरकारने प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व व्यापारी व कष्टकरी वर्गाला कोरोना पासून वाचताना च ते बेरोजगारी किंवा कर्जबाजारी पणाने मरू नयेत याची काळजी घ्यावी.
या निवेदनात आम्ही मागणी करतो की जेऊर आणि परिसरात असलेल्या छोट्या छोट्या दुकानदार, नाभिक समाज यांची दुकाने ,गॅरेज कृषी शी निगडित दुकाने व कामगार यांना व त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना योग्य ती खबरदारी मास्क सॅनिटाईजर चा वापर करून योग्य ते शारीरिक अंतर ठेवून गर्दी न करता व्यवसाय करण्यास परवानगी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांनी द्यावी.
 या निवेदनावर
देवानंद महादेव जाधव पाटील,
बालाजी चंद्रकांत गावडे यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा