Breaking

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे- खासदार हेमंत पाटील ----------------------------------------------------------------------



इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे- खासदार हेमंत पाटील 


-----------------------------------------------------
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील कळमनुरी,उमरखेड ,महागाव ,हदगाव ,हिमायतनगर तालुक्यातील संभाव्य  पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता शेती,पिण्यासाठी  व जनावरांसाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे असे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी  नांदेड येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिले . 
             नांदेड ,हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झाला जाणवत असून त्यामुळे मतदारसंघातील अनेक भागात संभाव्य पाणी टंचाई जाणवत आहे आणि या तिन्ही जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून इसापूर धरण ओळखले जाते  त्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली . ते म्हणाले कि,  मतदारसंघातील कळमनुरी, उमरखेड ,महागाव,हदगाव आणि  हिमायतनगर,किनवट व माहूर, या भागातील जनतेला आणि शेतीला पाणीपुरवठा इसापूर धरणातून होत  असतो. यंदाच्या उन्हाळ्यात  पुन्हा एकदा कोरोना आजाराने शिरकाव केल्याने एकंदरीत   परिस्थिती पाहता, पाणीटंचाई जन्य परिस्थिती निर्माण  झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात येते , परंतु यंदा मार्च महिना संपत आला तरी पाणी सोडण्यात आले,  नसल्याने शेतकरी व सर्व सामान्यांचे हाल होत आहेत.  यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन,  तात्काळ इसापूर धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड आणि  यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याना निर्देश दिले . 
               उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागासाठी आरक्षित करण्यात आलेले पाणी , पैनगंगा नदीमध्ये इसापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येवून  नदीकाठावरील गावांना दिलासा द्यावा . तसेच हदगाव , हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या ग्रामीण भागामध्ये आता पासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे या भागासाठी  सुद्धा आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यामधून  पाणीटंचाई निवारणार्थ पैनगंगा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे . असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी ,आणि यवतमाळ मधील उमरखेड शहराचा  पाण्याचा प्रश्न इसापूर धरणावर अवलंबुन आहे.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ,सर्व सामान्य जनता आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर बाब लक्षात घेऊन पाणीटंचाई पासून दिलासा देण्यात यावा.असेही  खासदार हेमंत पाटील म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा