*एक पाऊल कोरोनामुक्तीकडे, माझे कुटुंब माझी जबाबदारी भाग 2 मिशन अंतर्गत तुळजापूर येथे प्रबोधन करण्यात आले*
तुळजापूर येथील करोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी सुरक्षततेचे उपाय म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी,भाग -2 या मिशन अंतर्गत,प्रभाग क्र.1 मध्ये तुळजापूर खुर्द,गोपाळ नगर ,सारा गौरव कॉलनी , गवते प्लॉटिंग, नागने प्लॉटिंग, नेताजी नगर, शिवरत्न नगर, पारधी वस्ती या भागात दुसऱ्या टप्याचे कौटुंबिक आरोग्य तपासणी, थर्मल स्कॅनींग तपासणी,ऑक्सिजन तपासणी, आणि कोरोना लसीकरण या बाबत प्रबोधन करण्यात आले.तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे,नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी, नगरसेवक पंडितराव जगदाळे ,सौ. मंजुषाताई देशमाने, विनोद (पिटु)गंगणे, नारायण (भाऊ)ननंवरे,राजेभाऊ देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक तथा मुख्याध्यापक श्री. मोठे तुकाराम, सर्व्हेअर श्री. साळूंके बालाजी,सौ. किरण लोहारे, श्रीमती माने यांनी काम केले .या कामी सर्वांना सारा कॉलनी मधील रहिवाशी प्रकाश जगताप,विश्वजितीत पाटील, पांडुरंग हुंडेकरी, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर,प्रभाकर चव्हाण सर,राहुल गवळी सर, आबासाहेब कापसे, राजेश जगताप यांनी मदत आणि पूर्ण सहकार्य केले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा