Breaking

रविवार, २१ मार्च, २०२१

पत्रकारितेची बांधीलकी जपत पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांनी बेंबळे कराना शुद्ध पाणी देण्यासाठी "आद्या एक्वा फिल्टर" चा केला शानदार शुभारंभ.....


*पत्रकारितेची बांधीलकी जपत पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांनी बेंबळे कराना शुद्ध पाणी देण्यासाठी "आद्या एक्वा फिल्टर" चा केला शानदार शुभारंभ......*
      *बेंबळे।प्रतिनिधी/AJ 24 Taas News Maharashtra*              

  पत्रकारितेचे बांधिलकी जपत पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांनी बेंबळे करांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी
  एक्वा फिल्टर" चा केला शानदार  शुभारंभ व उद्घाटन करण्यात आले.

           वृत्तांत असा की बेंबळे येथील एक जिद्दी, कल्पक, हुशार, कष्टाळू व्यक्ती व पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांनी आपल्या घरी " एक्वा फिल्टर" चे मशीन स्वखर्चाने बसऊन आणि त्याला लागणारे सर्व साहित्य  बसवून गावासाठी शुद्ध आणि स्वच्छ फिल्टर पाण्याची सोय केली आहे. याचे उद्घाटन बेंबळे चे सरपंच विजय पवार, पार्टी प्रमुख आणि  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे, विठ्ठल एज्युकेशन चे चेअरमन पोपटतात्या अनपट , गुरुवर्य चव्हाण सर तसेच माजी सरपंच कैलास भोसले ,दादा भोसले, मराठा सेवा संघाचे संतोष शिंदे ,सज्जन आवताडे, सज्जन शिंदे ,मुकुंद रामदासी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . आद्या एक्वा फिल्टर मध्ये कार्ड स्वाइप करून  पाणी मिळते तसेच  पाच रुपयांचे नाणे क्वाईन बाँक्समध्ये टाकून वीस लिटर पाणी मिळवता येते.  स्वच्छ, शुद्ध पाणी फिल्टर केलेले पाणी चोवीस तास उपलब्ध होणार असल्यामुळे बेंबळकर नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे, व या उपक्रमाबद्दल पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांना धन्यवाद दिले जात आहेत.
  या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन हनुमंत आनपट ,सामाजिक कार्यकर्ते समाधान सलगर, तसेच अशोक देवकर, संभाजी चोरमल, दीपक किर्ते, नामदेव कांबळे ,मोहन भोसले , बासूभाई मुलाणी, बबलू काळे,  नाना भोसले ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी सर्वांचे स्वागत कुमारी आद्या शिंदे व शुभम शिंदे यांनी केले, तसेच सिद्धेश्वर शिंदे यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी पत्रकार सिद्धेश्वर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ .अनुराधा शिंदे यांना या नवीन उद्योग प्रकल्पाबाबत शुभेच्छा व्यक्त केल्या व सुयश चिंतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा