Breaking

बुधवार, १७ मार्च, २०२१

जादाची विजबिले दुरुस्त न झाल्यास स्वाभिमानी रास्ता रोको आंदोलन करणार*









*जादाची विजबिले दुरुस्त न झाल्यास स्वाभिमानी रास्ता रोको आंदोलन करणार*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

      शेतकऱ्यांची तोडण्यात येत असलेली कृषी पंपाची तसेच घरगुती व व्यावसायिक कनेक्शन्स  तोडण्याची मोहीम त्वरित न थांबवल्यास तसेच शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा आलेले विज बिल त्वरित दुरुस्त न करून दिल्यास 19 मार्च रोजी कुंभेज फाटा येथे  सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे .
       यावेळी स्वाभिमानाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, पक्ष तालुकाध्यक्ष बापूराव फरतडे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे, शेतकरी नेते दीपक शिंदे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेली आहे की सध्या कोरोना महामारी मुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आली आहेत. अतिशय अन्यायकारक पद्धतीने शेतकऱ्यांची कृषी पंपाची तसेच घरगुती, व्यावसायिक ग्राहकांची बिले अन्यायकारकरित्या आकारण्यात आलेली आहेत. तसेच शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची कनेक्शन तोडण्याची मोहीम त्वरित न थांबवल्यास 19 मार्च रोजी कुंभेज फाटा तालुका करमाळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमोल घुमरे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा