अकलूज येथे सायक्लॉथॉन' उत्साहात संपन्न
माळशिरस भाग्यवंत नायकुडे
AJ 24 Taas News Maharashtra
प्रदुषणमुक्त व निरोगी आरोग्या'चा संदेश देत अकलूज व परीसरातून झालेल्या सायक्लॉथॉन' उपक्रमात २०० पेक्षा जास्त मुली व महिलांनी आपल्या सायकलसह सहभाग नोंदविला.
शिवरत्न फाऊंडेशन, डॉटर्स मॉम फाऊंडेशन शिवामृत दूध रॉयल रायर्ड्स सायकल ग्रुप व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्यासाधून फक्त महिला व मुलींसाठी 'सायक्लॉथॉन' चे आयोजन केले होते. या सायक्लॉथॉनची सुरूवात विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल येथून माजी खा, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शिवरत्नचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, डॉटर्स मॉम फाऊंडेशन अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील, सैनिक हो तुमच्यासाठी ही राजेंद्र धायगुडे, डॉटर्स मॉम फाऊंडेशन अकलूज रोटरी क्लब, सराटी डिलाईट यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये १० ते १५ वयोगटातील मुली व १६ ते ६० या वयोगटातील मुली व महिला २०० पेक्षा जास्त मुली व महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग घेत 'एक दिन सायकल के नाम' म्हणत अंर्तगत प्रदुषणमुक्त व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला. विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल येथून सुरूवात होऊन सदुभाऊ चौक, गांधी चौक, इंदापूर रोड , आनंदी गणेश रस्ता, बोरावके वस्ती येथून परत क्रीडा संकूल येथे आल्यानंतर सहभागी सायकलपटूंना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
महिलांनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्य जपने गरजेचे असून 'प्रदुषणमुक्त व निरोगी आरोग्या'चा संदेश देण्यासाठी हा उपक्रम घेतला असून यापुढेही महिलांसाठी अनेक उपक्रम घेणार आहोत.
शीतलदेवी मोहिते पाटील, अध्यक्षा डॉटर्स मॉम फाऊंडेशन


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा