महिलांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आरोग्य धोक्यात आणू नये - अॅड.डाॅ.अरुण जाधव
श्रीगोंदा-नितीन रोही,
इकोनेट पुणे आणि ग्रामीण विकास केंद्र, जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज ढोकराई कारखाना जोशी वस्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर व तपासणी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उद्घाटक अॅड. डाॅ.अरुण जाधव बोलताना म्हणाले की या कोरोणाच्या काळात आजारी पडल्यावर अंधश्रद्धेपोटी बऱ्याच महिला देवादिकाचे पाहतात आणि दवाखान्यात जाण्याचे टाळतात त्यामुळे या जोशी वस्तीवर आरोग्य शिबिर घेतले पाहिजे असे येथील ग्रामीण विकास केंद्र संस्थेची कार्यकर्ती लता सावंत म्हणाली आणि इतर कार्यकर्त्यांची मदत घेऊन लता सावंत यांनी आज शिबिर घेतले .
त्यामुळे माझी सर्व महिलांना विनंती आहे की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आपण स्वतःचे आरोग्य धोक्यात आणू नका असे ते बोलताना म्हणाले ,तर महिलांनी चूल आणि मूल यात न गुंतता विविध व्यवसाय करावेत असे सुनीता भोसले म्हणाल्या. आणि महिला ही जगातील अनेक शोधाची जननी आहे असे मीरा शिंदे म्हणाल्या तर महिलांच्या आरोग्यासाठी लता सावंत यांनी जोशी वस्तीवर पाठपुरावा करून बऱ्याच महिलांना शौचालय बांधून दिले असे बापू ओहोळ म्हणाले आणि माझ्या दवाखान्यात या जोशी वस्तीवरील महिलांना पुढील आठ दिवस उपचार मोफत असेल असे डॉक्टर पाखरे म्हणाले.
या शिबिरासाठी डॉक्टर वैशाली, डॉक्टर चौधरी ,डॉक्टर प्रीती नांद्रे, आणि डॉक्टर राजेंद्र पाखरे व बुधराणी हॉस्पिटल च्या माया अाल्हाट यांनी महिला व पुरुषांची आरोग्याबाबत व्यवस्थित तपासणी केली.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे समन्वयक सचिन भिंगारदिवे, लिंपणगाव ग्रामपंचायतचे सरपंच शुभांगी सूर्यवंशी ,ग्रामपंचायत सदस्य उषा सावंत, काजोरी पवार ,छाया भोसले , रोहिणी राऊत, पल्लवी शेलार, संतोष भोसले, जितेंद्र काळे, सारिका गोंडे ,गुड्डी चव्हाण ,आबा चव्हाण ,मुमताज मुलानी, राजू शिंदे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शेलार तर प्रास्ताविक बापू ओहोळ आणि आभार सचिन भिंगारदिवे यांनी मानले अशी माहिती लोकअधिकार आंदोलनाचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा