*धारूरच्या घाटात ट्रक कोसळली चालक ठार*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
शहरापासून जवळच असलेल्या घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकखाली चिरडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज बुधवारी (दि.३१) सकाळी ११ वाजताच्या सुमारास झाला.
धारूर शहरापासून जवळचा कठीण घाट आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असतात. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास टीएन ४८ झेड ५२३५ हा रिकामा ट्रक धारूरहून माजलगावकडे जात होता.
घाटात असताना एका अवघड वळणावर चालकाचे त्राक्वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक अंदाजे ६० फुट खोल दरीत कोसळला.
यावेळी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ट्रकच्या बाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. दरम्यान, मृत चालकाची अद्याप ओळख पटलेली नाही


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा