साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचे सुशोभीकरणासाठी निवेद
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक असून या स्मारकाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्यासारखे दिसत आहे. स्मारकामध्ये अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा असून त्या पुतळ्याच्या भोवती चबुतरा बांधण्यात आलेला आहे परंतु सदर चबूतरा व आजूबाजूच्या परिसराचे कुठल्याही प्रकारचे सुशोभीकरण किंवा कंपाउंड ची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळेच सोमवार दि ०१\०३\२०२१ रोजी टेंभुर्णी येथील रामभाऊ पवार मित्र परिवाराच्या वतीने टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून स्मारकाच्या सभोवताली लोखंडी ग्रील चे कंपाऊंड बसवावे.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. लवकरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात येईल असे आश्वासन टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे यांनी दिले आहे.
यावेळी रामभाऊ पवार,आकाश जगताप,समीर नाईकनवरे,सागर कांबळे, प्रमोद शिंदे,रणधीर जगताप, प्रेमानंद धोञे व इतर नागरिक उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा