सिंदगी येथे " प्रशासन आपल्या गावी" अभियानाची यशस्वी सुरवात*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
प्रशासन आपल्या गावी या अभियानांतर्गत महसूल मंडळ सिंदगी (मो) येथे शासनाच्या विविध योजनांची माहीती तसेच सर्व सामान्य माणसापर्यंत शासकीय योजना पोहोच व्हावी याकरिता सर्व शासकीय विभाग प्रमुख, कर्मचारी हे मार्गदर्शन करत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक श्री माळवे यांनी केले.यानंतर किनवटचे तहसीलदार मा.उत्तम कागणे यांनी गावातील विविध योजनांवर प्रकाश टाकत ग्रामस्थांकडून दिलेल्या निवेदनांचा ज्या त्या विभाग प्रमुख यांच्यामार्फत सोडविण्याचे व पाठपुरवठा करण्याचे सांगितले.तसेच अनेक प्रश्न जागेवरच निकाली काढली.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी धनवे,आरोग्य विभाग प्रमुख व कर्मचारी, शिक्षण विभाग प्रमुख व कर्मचारी, पशुसंवर्धन प्रमुख व कर्मचारी,महिला आर्थिक विकास महामंडळ कर्मचारी,कृषी विभाग प्रमुख व कर्मचारी, पाटबंधारे विभाग किनवट विभाग प्रमुख, महसूल मंडळातील सर्व ग्रामसेवक, तलाठी हे हजर होते.
तसेच गावच्या सरपंच पिंपळेवाड ताई,उपसरपंच श्री येरेकार,श्री मारोती पिंपळेवाड,सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रेमसिंग नाईक पंढरीनाथ ठाकरे,पंडीत व्यवहारे (सरपंच कनकवाडी) नारायण सुरकुंडे (सरपंच मोहपूर),पोलीस पाटील बालाजी वानखेडे ,तंटामुक्ती अध्यक्ष मेरसिंग चौहान, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी शिरडकर व सर्व सदस्य नितीन राठोड (पत्रकार दैनिक देशोन्नती) गजानन वानखेडे(पत्रकार दैनिक हिंदुसम्राट) यावेळेस उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन बैस यांनी केले.तर आभारप्रदर्शन तलाठी भालेराव यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा