Breaking

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उन्नती, प्रगती आणि भरभराटीसाठी सदैव तत्पर .आ. बबनराव शिंदे। "21संचालकाची बिनविरोधनिवड जाहीर" कारखान्याचे आर्थिक व्यवहार राज्यातआघाडीवर



विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उन्नती, प्रगती आणि भरभराटीसाठी सदैव  तत्पर ......               आ. बबनराव शिंदे। 
 
          "21संचालकाची बिनविरोधनिवड जाहीर"  

  
  कारखान्याचे आर्थिक व्यवहार  राज्यातआघाडीवर 






बेंबळे। प्रतिनिधी

           उसाचे गाळप ,उसाला प्रति टन दर,व संबंधित सर्वांशी देय असलेले पेमेंट इत्यादी सर्व आर्थिक व्यवहाराबाबत राज्यात सतत अव्वल स्थानावर असल्यामुळेच सर्व सभासदांनी सलग चौथ्यांदा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध करून दाखवली आहे, यापुढेही व सदैव शेतकऱ्यांचे सर्वांगीण आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कारखाना सदैव तत्पर असेल असा ठाम विश्वास देतो अशी ग्वाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
           सविस्तर वृत्त असे की 2021ते 2026 या कालावधीसाठीची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली, याची अधिकृत घोषणा व माहिती देण्यासाठी जिल्हा निबंधक यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या सभासद शेतकऱ्यांच्या सभेत आमदार बबनराव शिंदे बोलत होते. व्यासपीठावर अस्थायी निवडणूक निर्णय अधिकारी, डी डी आर कुंदन भोळे, सहाय्यक निबंधक गावडे, प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव व सर्व  21 नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. सर्वप्रथम अस्थायी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली व संचालकांच्या 21 जागा साठी 21 अर्ज वैध ठरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असे घोषित केले व नूतन 21 संचालकांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी सर्वांचे स्वागत करून अस्थायी निवडणूक अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानले .
      निवड जाहीर झाल्यानंतर उपस्थितांच्या समोर विचार व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की स्थापनेपासून आजतागायत सलग चौथ्यांदा ही निवडणूक बिनविरोध होत आहे याला कारण सभासद, कामगार ,अधिकारी ,व शेतकरी यांचे मागील वीस वर्षातील प्रेम,व विश्वास हेच आहे. या चालू गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 1 पिंपळनेर येथे आज पर्यंत 14 लाख पाच हजार टन उसाचे गाळप तर युनिट नंबर 2 करकंब येथे तीन लाख 80 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे ,असे एकूण 17 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे आजपर्यंत गाळप झाले आहे. कारखाना पाच किंवा सहा मार्च पर्यंत बंद होणार असून कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही याची हमी देतो. साखरेचा उतारा( रिकवरी) युनिट 1 मधे11.10 टक्के तरी युनीट 2 मधे10.82 टक्के अशी आहे .कारखान्याची एफ आर पी 2375 रुपये असून आतापर्यंत 30 जानेवारीपर्यंत च्या शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या उसाचे प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे ॲडव्हान्स बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम पोळा व दिवाळीपर्यंत देण्यात येणार आहे. दोन्ही युनिटमध्ये सात कोटी 75 लाख युनिट वीज निर्मिती करून 45 ते 48 कोटी रुपयांची वीज ,वीज मंडळाला विकली आहे, मागील व चालू हंगामात साखर निर्यात केलेले 66 कोटी रुपये येणे  केंद्र सरकारकडे अद्याप बाकी आहे. मागील वीस वर्षात 2500 मेट्रिक टन गाळप क्षमतेचा कारखाना आज 12 हजार मेट्रिक टन क्षमतेने चालत आहे, 7.5 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती आज 38 मेगावॅट पर्यंत आहे तर तीस हजार लिटर दररोज निर्माण होणारे इथेनॉल ची डिस्टिलरी आज एक लाख पन्नास हजार लिटर उत्पादन करत आहे. शासकीय आदेशाप्रमाणे 3100 ₹ क्विंटल च्या खाली आम्ही साखर विकली नाही त्यामुळे मागील तीन महिन्यातील रिलीज मेकॅनिझम रक्कम बुडाली आहे.
चौकट....
 शून्य पर्यावरणसाठीचा( झिरो पोलुशन) नवीन स्वतंत्र बॉयलर तयार असून यामध्ये कारखान्यातून बाहेर पडणारे स्पेंटवाँश जाळले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात यापुढे आता कुठेही प्रदूषण असणार नाही. सध्या परिस्थिती अशी असून देखील कारखान्याचे आर्थिक नेटवर्क अतिशय उत्तम आहे आणि शेतकर्यांची उसाची बिले, ऊस तोडणी कामगारांची बिले , ट्रॅक्टर वाहनाची बिलं, कर्मचाऱ्यांचे पगार आदी सर्व बाबी व देयके वेळेवर देण्यात येणारा महाराष्ट्रातील विठ्ठलराव शिंदे हा एकमेव कारखाना आहे .कारखान्यासाठी आज पर्यंत आपण सर्वजण विश्वास, प्रेम आणि सहकार्य देत आलात यापुढेही मी अशी अपेक्षा करतो व सदैव शेतकऱ्याच्या उन्नती या प्रगतीचा हा कारखाना विचार करेल अशी पुन्हा एकदा ग्वाही देऊन देतो असे भावनिक आव्हान आमदार शिंदे यांनी केले.
 चौकट ...
 कोरोना महामारी च्या संदर्भात आ. बबनदादा शिंदे म्हणाले की मागील वर्षभर कोरोनामुळे सर्वांची कुचंबना झाली हे संकट अजूनही टळलेल नाही. आपले आरोग्य महत्त्वाचे आहे म्हणून सर्वांनी मास्क वापरावा ,सँनेटायझर आणि सोशल डिस्टंनसिंगचा वापर करावा व या कोरोना काळात कारणाशिवाय अनावश्यक बाहेर फिरू नये.  सण समारंभ, लग्न, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी गर्दी करण्याचे टाळावे व आपले आरोग्य सांभाळावे अन्यथा आपल्यातीलच अनेक चांगल्या लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे याचा आपण अनुभव घेतलाच आहे.,तरी सर्वांनी काळजी घ्या. 
          कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी सर्व उपस्थितांना धन्यवाद देऊन आभार मानले. या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी ,तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी ,सहकारी बँकांचे पदाधिकारी ,शेतकरी नागरिक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा