Breaking

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

सोलापूर जिल्ह्यातील लोग्डाऊन काळात 13 दारु दुकानांचे परवाने कायम स्वरुपी जिल्हाधिकारी यांनी केले रद्द*



*सोलापूर जिल्ह्यातील लोग्डाऊन काळात 13 दारु दुकानांचे परवाने कायम स्वरुपी जिल्हाधिकारी यांनी केले रद्द*
*********************************
*बशीर जहागीरदार यांच्या तक्रारीमुळे झाली कारवाई
******************************
टेंभुर्णी प्रतिनिधी AJ 24 Taas News



सोलापुर जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात परमिटरूम, बिअर-बार,बिअर शॉपी व वाईनशॉप बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते.त्या अनुषंगाने जिल्ह्यात सगळीकडे परमिटरुम बंद होते परंतु लॉकडाउनच्या काळात काही परमिटरुम धारकांनी जास्त भावाने दारू विक्री करुन सर्व स्टॉक संपवलेला होता.परत  प्रशासनाला स्टॉक देताना यांना अडचण येणार असल्याने व्यवस्थीत स्टॉक दाखवण्यासाठी बरेच दारु दुकानदारांनी डुप्लीकेट दारुचा स्टॉक दाखवला असल्याची तक्रार व लॉगडाउनमध्ये दारुविक्री करीत असल्याची तक्रार टेंभुर्णीचे सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व दारुबंदी मंत्रालय यांचेकडे केली होती.त्याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांनी याविषयी तातडीने चौकशी करुन कारवाईचे आदेश 15 जूलै रोजी दिले होते. 
                अनेक बिअर-बार, परमिट रूम, वाईनशॉप व बिअर शॉपिच्या मालकांनी त्यांच्या जवळचेसर्व अधिकृत स्टॉक जास्त भावाने विकुन संपवले होते. उलट परत विक्रीसाठी माल कमी पडले म्हणुन डुप्लीकेट माल आणून विकले होते. हा सर्व प्रकार उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेले आहे.सोलापुर जिल्ह्यात पंढरपर येते उत्पादन शुल्क अधिकारी लॉकडाउनच्या काळात दारू विकताना सापडले होते त्यांचेवर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित देखील करण्यात आले होते. दारूबंदी असताना जास्त भावाने दारू विक्री करुन कोरोनाच्या या महामारीत दारू विक्रेते यांनी दारू विकुन अनेकांचे प्रपंचाचे वाटोळे केले असल्याचे तक्रारीत नमुद केले होते .
              दारुचा स्टॉक दाखवण्यासाठी डुप्लीकेट दारुचा वापर होणार असण्याची दाट शक्यता होती. त्या शिवाय त्यांना स्टॉक दाखवता येणार नव्हते. सोलापुर जिल्ह्याचे अधिकृत दारू विक्रेते होलसेलर हे परमिट रूम, बिअर बार, वाईनशॉप व बिअर शॉपी यांना सध्यस्थितित माल देऊ शकत नसल्याने, तसेच दिले तर त्यांना स्टॉक दाखवणे अवघड होत असल्याने आता चारी बाजुने डुप्लीकेट दारुचा पाऊस पडणार असल्याची माहीती जहागीरदार यांनी जुन महिन्यात प्रशासनाला दिली होती. रात्रभर डुप्लीकेट दारुचे वाहन या दुकानदारांना कोरोनाचे महामारीत माल पोच करीत होते. ही बाब गंभीर असल्याने तसेच डुप्लीकेट दारुने मद्यपेयेच्या जीवितास धोका असल्याने या बाबतची पुर्व कल्पना तक्रारी मध्ये देण्यात आली होती.
       बशीर जहागीरदार यांचे तक्रारीची गंभीर दखल घेत दारूबंदीमंत्री यांनी कारवाईचे आदेश दिले होते,त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे आदेशान्व्ये जिल्ह्यात संशयित परमिटरुम बिअरबार,बिअर शॉपी यांचेकडे धाडस्त्र करुन अनेक ठिकाणी धाड टाकुन जिल्यातील एकुण 13 परमिटरुम,बिअरबार, बिअर शॉपी व देशी दारुदुकानांवरती कारवाई करुन सदरचे दुकानांचा परवाना कायम स्वरुपी रद्द करुन काही दुकानदारांवरती फौजदारी गुन्हा देखील दाखल केले असल्याची माहीती जिल्हाधिकारी यांनी 29 जनवरी रोजी पत्राद्वारे दिली असल्याची माहीती बशीर जहागीरदार यांनी दिली आहे.




***************
*AJ 24 Taas News Maharashtra channel*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा