Breaking

शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

कुर्डुवाडीत कोरोनोची रिकव्हरी शंभर टक्के* *तीन महिन्यात रुग्णसंख्या सात टक्क्यांवर.जिल्ह्यात मारली बाजी* *तीन महिन्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही**




*कुर्डुवाडीत कोरोनोची रिकव्हरी शंभर टक्के*
     *तीन महिन्यात रुग्णसंख्या सात टक्क्यांवर.जिल्ह्यात मारली बाजी*
     *तीन महिन्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही*
AJ 24 Taas News Maharashtra
*✒️कुर्डुवाडी प्रतिनिधी/अरुण कोरे 

    *कुर्डुवाडी नगरपालीका व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या उत्कृष्ट उपाय योजनेमुळे शहरात एकही कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण राहीला नाही.*
       *कुर्डुवाडी शहरात १५जुलै २० मध्ये पहिला कोरोनो रुग्ण आढळून आला होता.त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात ५२२ रुग्ण आढळून आले.*
     *त्याच दरम्यान आरोग्य अधिकारीच पाॅझीटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती.परंतू विलिगीकरणातून आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने नियोजनबद्ध जी धडक मोहीम राबविण्यात आली त्यास चांगलेच यश आल्याचे दिसून येते.*
     *१५ जुलैच्या रुग्णानंतर प्रथम तीन महीन्यात ३५५०तपासणीत ५२२ रुग्ण आढळून आले होते.त्यात २२जणांचा मृत्यू झाला होता.मात्र रुग्णांचा रिकव्हरी दर ९९.२६ ने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता.*
       *त्यानंतर आजपर्यंत एकूण ४४०३ रुग्ण तपासण्यात आले असून ५८२ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत.म्हणजे गेल्या तीन महिन्यांत सुमारे ८५३ रुग्ण तपासले असून फक्त ६० च रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांत एकाचाही मृत्यू झाला नाही.*
     *एकूण सहा महिन्यांच्या आकड्यांचा विचार करता १३ टक्के रुग्ण आढळून आले.त्यात गेल्या तीन महिन्यांत हेच प्रमाण सात टक्क्यांवर खाली आले आहे.बारा दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही दोन-तीन दिवसांपासून तर एकही अॅक्टिव्ह रुग्ण शिल्लक राहिला नाही.*
   *याच दरम्यान हाय रिस्क संपर्क २४४५ व लोक रिस्क ४९६० जणांची चेकयादीचीही न.पा.च्या वतीने पडताळणी करण्यात आली.*
      *कुर्डुवाडी नगरपालीकेचे मुख्याधिकारी समीर भुमकर, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्नांमुळे डॉ.सुनंदा रणदिवे(गायकवाड),त्यांचा सर्व स्टाफ,न.पा.चे मुकादम सुरेश कदम सहा.मुकादम शिवा खवळे सर्वं आरोग्य दूत यांच्या अथक परिश्रमाने व कठोर उपाययोजनांमुळे दोन दिवसांपासून कुर्डुवाडी शहर कोरोनो मुक्त झाले असून शंभर टक्के रिकव्हरीने सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडीने बाजी मारली आहे ही अभिमानास्पद व अभिनंदनीय आहे.नागरिकांनीही उशिरा का होईना केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने धन्यवाद दिले असून सतर्क रहाण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा