*जातेगाव ग्रामस्थांनी विकास कामाच्या माध्यमातून आदर्श उभा करावा -गणेश करे पाटील*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या जातेगाव ग्रामपंचायत चा निकाल धक्कादायक व ऐतिहासिक असून आता आदर्श कारभार करून विकास कामाच्या माध्यमातून आदर्श गाव निर्माण करण्याचे आवाहन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी करमाळा येथे बोलताना केले.
जातेगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ यश कल्याणी भवन येथे आयोजित केला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी अच्युत काशिनाथ कामटे, छगन जगन्नाथ ससाणे ,सौ मनीषा अशोक शिंदे ,सौ सुमित्रा बाळासाहेब धुमाळ, आजिनाथ लालासाहेब निगडे, सौ रोहिणी बाबासाहेब शिंदे,सौ गौरी प्रमोद वारे, सौ सुनंदा ज्ञानदेव वारे, सौ प्रज्योती रमेश पाटील आदि नवनिर्वाचित सदस्यांचा गणेश करे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सरपंच ही एक खूप मोठी शक्ती आहे . सरपंचाने मनात आणले तर तो गावाचा कायापालट करू शकतो.सरपंच म्हणजे लोकशाहीचे एक सुवर्णपान असून आपल्या हाती आलेल्या सुवर्ण संधीचे सोने नवनिर्वाचित सदस्यांनी करावे. दीनदुबळ्या लोकांची सेवा नूतन सदस्यांच्या हातून व्हावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.निवडणुकीच्या माध्यमातून जातेगाव ग्रामस्थांनी जसा ऐतिहासिक विक्रम घडवला तसाच आदर्श विकासकामांच्या माध्यमातून उभा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .बहुतांश उमेदवार हे तरूण ,ताज्या दमाचे असल्यामुळे एक नवी क्रांती यानिमित्ताने होईल आणि जातेगाव ग्रामपंचायत चे नाव सर्वदूर पोहोचेल असा आशावाद त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी प्रमोद वारे, प्रवीण शिंदे, अच्युत कामठे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुका उपाध्यक्ष अमोल घुमरे,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे,
प्रवीण शिंदे, मोहन धुमाळ, काशिनाथ कामटे, बापूसाहेब पठाण, रामदास शिंदे, शिवाजी माने ,कांतीलाल शिंदे ,विनोद वारे, बाळासाहेब धुमाळ, ईश्वर वारे ,कालिदास सुपेकर, भाऊसाहेब धुमाळ, अंकुश आरणे, गौतम ससाणे, मेजर मयूर गुटाळ तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा