बिलोली हत्याकांडातील आरोपीला तात्काळ फाशी द्या.
लहुजी शक्तीसेनचे अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी .
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
बिलोली जिल्हा नांदेड येथील मातंग समाजातील मुकबधिर मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अमानवी घटनेचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना मा. तहसीलदार तहसील कार्यालय इंदापूर , मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे. तसेच अश्या गोष्टींना आळा बसावा यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप म्हणाले अलीकडच्या काळात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत.व बलात्कार करणाऱ्या नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही असं दिसुन येत आहे.तरी आरोपींना फाशीची शिक्षा करावी जेणेकरून अश्या नराधमांना कायद्याचा धाक निर्माण होईल.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, सामाजिक कार्यकर्ते मा.साजन भाऊ ढावरे, शहर अध्यक्ष मा. आकाश भाऊ अडसूळ,पूर्व ता.युवक उपाध्यक्ष मा नंदू भाऊ जगताप, दूधगंगा स. संस्था संचालक मा उमेश भाऊ जगताप हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा