Breaking

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

उमरा फुलमळा तांडा येथील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- आ.शामसुंदर शिंदेनांदेड




उमरा फुलमळा तांडा येथील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- आ.शामसुंदर शिंदे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

उमरा फुलमळा तांडा ता.लोहा येथील गावकऱ्यांनी उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पिण्याच्या पाणी प्रश्ना संदर्भात आ.शामसुंदर शिंदे यांची भेट घेऊन पाणी प्रश्नासाठी चर्चा केली.भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मुला बाळासह पायपीट वणवण करावी लागते,गावापासून 4 ते 5 किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या फुलमळा तांड्याचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर पूर्ण पणे मिटावावा यासाठी गावकऱ्यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

आ.शामसुंदर शिंदे यांनी उमरा फुलमळा तांडा येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले...

यावेळी उमरा सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते मा.भास्करराव पाटील जोमेगावकर उमरा येथील माजी.सरपंच मा.रामराव राठोड बालाजी पवार रावसाहेब राठोड रामराव पाटील सिरसाट दिगांबर पाटील सिरसाट श्रावण राठोड युवा कार्यकर्ते अविनाश पाटील उमरेकर आदी गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा