Breaking

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

*आलेगाव च्या तरुणांने वृद्धाआश्रमात फळे व ग्रंथालयाला पुस्तके देऊन केला अनोखा वाढदिवस साजरा**भीमानगर/प्रतिनिधी*




*आलेगाव च्या तरुणांने  वृद्धाआश्रमात फळे व ग्रंथालयाला पुस्तके देऊन केला अनोखा वाढदिवस साजरा*
*भीमानगर/प्रतिनिधी*

 माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील जोतीराम राजगुरू यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपला वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील वाचनालयाला पुस्तके भेट देऊन व टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमातील अनाथांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस हा आपला आनंद न राहता समाजाच्या उपयोगी पडावा हा त्यांचा यामागील उद्देश आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले पुस्तकातून ज्ञानात भर पडते तर वृद्धाश्रमातील अनाथांना फळेवाटप केल्याने आपलेही कोनीतरी काळजी करणारे आहे अशी भावना निर्माण झाली व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

विशेष म्हणजे जोतीराम राजगुरू यांनी याच्या अगोदर गावात वृक्षारोपण केले होते.त्यामध्ये चिंच, करंजी,तुती,लिंबू,वड, उंबर,पिंपळ झाडांचे गावात घरोघरी वाटपही केले होते.वाढदिवसाला अनाठायी येणारा खर्च टाळून समाजाला उपयोगी पडेल असे सामाजिक कार्य केल्याबद्दल जोतीराम राजगुरू यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 यावेळी आलेगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष भैरवनाथ चंदनकर,प्रदीप पाटील, सतीश काळे, विकास राजगुरू,विनायक राजगुरू,दशरथ महाडिक, यांनी मनोगत व्यक्त केले तर राजू ठावरे, भैरवनाथ शेलार, दत्तात्रय चंदनकर, समाधान पाटील,महावीर चंदनकर, तानाजी घोगरे,सागर कांबळे,विकास राजगुरू, आकाश खंकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा