Breaking

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 धनोडा ते भोकर महामार्ग अंतर्गत काम निकृष्ट कामाचे केंद्रीय गुणवत्ता विभागाकडून तात्काळ तपासणी करावी.बहुजन मुक्ती पार्टीचे किनवट सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...



राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 धनोडा ते भोकर महामार्ग अंतर्गत कोठारी ते हिमायतनगर पर्यंतचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाचे केंद्रीय गुणवत्ता विभागाकडून तात्काळ तपासणी करावी.

बहुजन मुक्ती पार्टीचे किनवट सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 धनोडा ते भोकर महामार्ग अंतर्गत कोठारी ते हिमायतनगर पर्यंतचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदर कामाचे केंद्रीय गुणवत्ता विभागाकडून तात्काळ तपासणी करून काम करणाऱ्या यंत्रणेविरुद्ध कायदेशीर कारवाई करून महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण पुनरनिर्माण करणे बाबत यासंदर्भात आज किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले...

   नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका एकेकाळी आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख होती अशा ओळख असलेल्या तालुक्‍याच्या सर्वांगीण विकास व्हावा व बेरोजगार तरुणांना मोठ्या उद्योगातून रोजगार मिळावा या उदात्त हेतूने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी माहूर देवस्थान डोळ्यासमोर ठेवून धनोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून माहूर देवस्थान मार्ग विदर्भात जाणारा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून चालू आहे कोठारी ते हिमायतनगर पर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असून सदर महामार्गावर आजपर्यंत अनेक यंत्रणेने काम केली असून काम अंदाजपत्रकाच्या निकषाप्रमाणे होत नसल्याने सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणेला महामार्ग निर्माण करण्याचे काम देण्यात आले सदर यंत्रणेद्वारे होत असलेले काम आतापर्यंतच्या कामापेक्षा निकृष्ट दर्जाचे होत असून पूर्ण झालेल्या कामावर आतापासूनच भेगा पडत असल्याने काम पूर्ण होईपर्यंत आज पर्यंत झालेले काम हे पूर्ण उखडून जाणार असून यापुढे होणारे काम केंद्रीय गुणवत्ता विभागाचे अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात यावे मागे झालेले काम भेगा पडलेल्या ठिकाणी मटेरियल ची तपासणी करून काम पुनर्निर्माण करण्यात यावे.
तसेच सदर कोठारी ते हिमायतनगर पर्यंत सदर यंत्रणेने महामार्गाच्या दोन्ही बाजूने खोदकाम करून मोठी नाली केल्याने शेजारील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी व शेतातील आणण्यासाठी सरकारी पानदान मोकळे करून रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी चालू असलेल्या कामावर यंत्रणेद्वारे किमान दिवसातून दोन वेळा पाणी टाकण्यात यावे जेणेकरून शेतातील मालावर धुळीचे थर जमून यापुढे पिकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी व आजपर्यंत धुळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तपासून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा कोठारी जवळ कामाच्या नकाशाचे फलक लावण्यात यावे यामध्ये महामार्गाची सर्व तपशीलवार माहिती असावी याठिकाणी पुलाचे काम चालू आहे त्या ठिकाणी रस्त्याचे निदर्शन लावण्यात यावे यासह अनेक आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करून यंत्रणेने यापुढे महामार्गाचे काम करावे
तरी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी आपणास विनंती करण्यात येते की निवेदनात नमूद बाबीवर सात दिवसाच्या आत कारवाई करण्याच्या संबंध संबंधाने महामार्गाचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या जबाबदार अधिकारी कर्मचारी व अभियंता यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव महामार्ग शेजारील शेतकरी व विविध सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन पक्षाच्यावतीने चक्काजाम आंदोलन तालुका भर करावे लागेल तसेच आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची व काम करणारे यंत्रणेची राहील असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे किनवट तालुकाध्यक्ष संतोष अडकिने पाटील तालुका सचिव विजय वाघमारे यांच्या सह बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा