*******************************
इंदापूर प्रतिनिधी: शिवाजी पवार*
उपमुख्यमंञी नामदार अजित ( दादा ) पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी हजारो सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने लोकप्रिय आमदार आदरणीय भारत भालके यांच्या पार्थिवावर पुष्षचक्र अर्पण करून वाहिली शाब्दिक श्रद्धांजली.
पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भारत भालके यांच्या पार्थिवावर हजारो सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार साहेब व राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना कै. भारत भालके यांच्या जाण्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ख-या अर्थाने आज पोरकी झाली असल्याची भावना श्रद्धांजली वाहताना व्यक्त करून ऐसे नेतृत्व पुन्हा होणार नसल्याची भावना बोलून दाखवताना आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब व पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय भरणे यांचे भावनिक श्रद्धांजली ऐकून उपस्थित हजारो जनसमुदायांना अाश्रु अानावर झाले.
सर्वसामान्य जनतेच्या मनातील विठ्ठलाला व लोकनेतृत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या भुमीत करमाळाचे आमदार श्री संजय मामा शिंदे, मोहोळचे आमदार श्री यशवंत (तात्या)माने, सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह आजी माजी आमदार, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा जनसागर लोटला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा