Breaking

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

बेंबळेत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरीकांनी कटाक्षाने काळजी घ्यावी.. पो.पा. बीभिषण किर्ते ' तीन महिन्यात सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु'




बेंबळेत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरीकांनी कटाक्षाने काळजी घ्यावी.  पो.पा. बीभिषण  किर्ते      



   ' तीन महिन्यात सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु'

  बेंबळे।प्रतिनिधी

बेंबळे गावात सध्या कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढण्याचे संकेत दिसून येत आहेत. मागील दोन महिन्यापासून काही संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब कोविड पॉझिटिव आलेले आहेत. यातील बरेच जण उपचारानंतर बरेही झाले आहेत.  मागील तीन महिन्यात सहा व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे तरीही नागरिक बेफिकीर, उद्धट व निष्काळजीपणे वावरताना दिसून येत आहेत. आता आठवडा बाजार सुरू झालेला आहे, मंदिर देवदर्शनासाठी खुले झाले आहेत व नववी ते बारावी पर्यंतचे वर्गही सुरू झालेले आहेत व विशेष असे की या गावातील शेकडो नागरिकांना पोलिस, आरोग्य कर्मचारी, ग्राम सुरक्षारक्षक, आदींनी अनेकवेळा नियम पाळणे विषयी सांगूनही नागरिक ऐकत नाहीत असे दिसून येत असल्यामुळे आता" माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी स्वतः घ्यावी असे आग्रही आव्हान पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांनी केलेले आहे.
     बेंबळे गावात चिकनगुनिया, सर्दी पडसे, खोकला, ताप, अंगदुखी, सांधेदुखी आदी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे. अनेक व्यक्ती गावातील खाजगी दवाखान्यात किंवा अकलूज, कुर्डूवाडी, टेंभुर्णी ,सोलापूर अशा शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचार घेताना दिसून येत आहेत. शासकीय आरोग्य केंद्रात कमी नागरिक तपासण्यासाठी जात आहेत तर खासगी दवाखान्याकडे मात्र जास्त लोक जात आहेत, त्यामुळे कोणाच्या कुटुंबात कोणत्या प्रकारचे रुग्ण आहेत हे समजून येत नाही व काही नागरिक कुटुंबात पॉझिटिव्ह रुग्ण असतानादेखील कोणाला काहीही न सांगता - बोलता बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येतात. जे कोणी,उपचार घेऊन दहा-बारा दिवसानंतर बरे झालेले आहेत अशाही व्यक्ती निष्काळजीपणे सर्वत्र वावरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोणी कोणासमोर जावे किंवा भेटावे याबद्दल नागरिकांच्या मध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी आता" माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अंतर्गत गावातील प्रत्येकांनी मास्क वापरावा, सँनेटायझरचा वापर करावा, स्वच्छता राखावी, बाजार, दुकान ,शाळा-कॉलेज, मंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे काटेकोर पालन करावे असे आग्रहपूर्वक आव्हान पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांनी केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा