Breaking

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

बारलोणी येथे तालुका कृषि विभागाच्या वतीने ज्वारी बियाणे वाटप*




*
*बारलोणी येथे तालुका कृषि विभागाच्या वतीने ज्वारी बियाणे वाटप*


  टेंभुर्णी (प्रतिनिधी)  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत कुर्डूवाडी मंडळ कृषी कार्यालयाच्या वतीने बारलोणी येथे ज्वारी पीक प्रात्यक्षिकाचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

 यावेळी कृषी अधिकारी हनुमंत बोराटे, कृषी पर्यवेक्षक खरात ,कृषी सहाय्यक आजिनाथ शिंदे ,विशाल गावडे ,बारलोणी चे सरपंच संजय लोंढे ,सुरेश बापू बागल ,व्यंकटेश नाना पाटील ,अधिक जण उपस्थित होते. सदर  प्रकल्प अंतर्गत 30 हेक्टर क्षेत्रावर तीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत 75 शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती कृषी अधिकारी हनुमंत बोराटे यांनी दिली. तसेच ज्वारी बीज प्रतिक्रिया प्रत्यक्षिक कृषी सहाय्यक आजिनाथ शिंदे यांनी करून दाखवले. तसेच यावेळी गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ज्वारी बियाणे चे वाटप करण्यात आले.

 या कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी बांधव हजर होते. शेवटी आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक आजिनाथ शिंदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा