Breaking

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

बेंबळे येथील भोसले पार्टीच्या प्रमुखपदी श्री दिलीपराव भोसले यांची निवड* aj24taas news Maharashtra


*बेंबळे येथील भोसले पार्टीच्या प्रमुखपदी श्री दिलीपराव भोसले यांची निवड* 


टेंभुर्णी प्रतिनिधी aj24taas news Maharashtra
**********Anil jagatap tembhurn************

टेंभुर्णी प्रतिनिधी
   बेंबळे येथील भोसले पार्टी ही विमलेश्वर ग्राम विकास आघाडी म्हणून 1952 साली कै. दगडू दादा भोसले यांनी स्थापन केली,सन 1952 ते 1965 पर्यंत पार्टी प्रमुख म्हणून त्यांनी पार्टी सांभाळली. त्यानंतर भागवत आप्पा भोसले यांनी सन 1965 ते 1980 पर्यंत पार्टी प्रमुख म्हणून काम पाहिले.तिसऱ्या पिढीमध्ये श्री गोविंद आप्पा भोसले सर यांनी 1980 ते 2020 पर्यंत भोसले पार्टी सक्षमपणे सांभाळली व नेतृत्व केले.
             भोसले पार्टीची कार्यसमिती व सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी सर्वानुमते चौथ्या पिढीमध्ये पार्टीचे प्रमुख म्हणून श्री दिलीपराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे.दिलीपराव भोसले यांचे समाजकारण व राजकारणातील आजपर्यंतचे योगदान तसेच त्यांनी सांभाळलेले  मार्केट कमिटीचे संचालक पद व विकासाची दूरदृष्टी या गोष्टींचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली. तसेच निवड झाल्यानंतर पदभार माजी अध्यक्ष गोविंद आप्पा भोसले सर यांनी दिलीपराव भोसले यांच्याकडे दिला. यावेळी दिलीपराव भोसले असे म्हणाले की आजपर्यंत आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाची सेवा व कार्य पाहून माझी भोसले पार्टीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मी भोसले पार्टी चे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत नेऊन, सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. सदर निवडीवेळी बेंबळेचे सरपंच प्रतिनिधी किशोर कदम, दीपक बापू भोसले,डिगंबर भोसले,वाय जी भोसले सर,समाधान भोसले,जयवंत भोसले हर्षल भोसले, बाळासाहेब भोसले,माजी ऊपसरपंच गोरख मिस्कीन,शैलेश कीर्ते,भाऊ कांबळे,भरत भोसले, सदाशिव भोसले, ग्राम.सदस्य डॉ भीमराव पवार,नागेश पवार, बापू काळे,बाळासो पवार, रामराजे डरंगे,नवनाथ माने, अरुण माने, संजय पवार, अमरसिंह पवार,ज्योतीराम नागटिळक,विष्णू काळे आदी सर्वजण उपस्थित होते.
     भोसले पार्टी प्रमुख पदी निवड झाल्यानंतर युवराज बप्पा भोसले, विश्वजीत भोसले,रवी भोसले,अरूण आप्पा भोसले,राजाभाऊ भोसले,महादेव आवताडे,पोपटराव काळे, राजाभाऊ किर्ते,दत्तात्रेय काळे, गणपत भाऊ हुंबे, धोंडीराम मिस्कीन संभाजी दादा भगत यांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा