*#जिजाऊ डेअरी मार्टचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन!*
*******"******************
टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) गिरिप्रेमी ग्रुपचे आमचे सहकारी मित्र सतीश पाबळे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी एकत्र येऊन पुणे-अहमदनगर मार्गावर खराडी बायपास जवळ जिजाऊ डेअरी मार्ट या दुग्धजन्य पदार्थ, केक, चहा, खाद्यपदार्थ, ड्रायफ्रूट्स, स्नॅक्स हे दालन सुरू केलेले आहे.अशा एकत्रित भव्यदिव्य शॉपचे उद्घाटन वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, गिरिप्रेमी ग्रुपचे प्रमुख रविदादा ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष कटके, डॉ. श्रीमंत कोकाटे,लहुजी लांडगे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
जिजाऊ डेअरी मार्ट या भव्य दालनामध्ये दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये विशेषता आपल्या समोरच मशीनवरती खव्यापासून ताजा पेढा दिला जातो. केकचे विविध पदार्थ, जगभरातील ड्रायफ्रूट्स, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. ग्राहकांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आहे.याठिकाणी विक्री केले जाणारे पदार्थ कसे बनवले जातात, हे देखील ग्राहकांना पाहता येते. किचन स्वच्छ आणि पारदर्शक आहे. प्रवेशद्वारावरती दादाच्या चावडीचा सुप्रसिद्ध चहा आणि वडापाव तसेच सुप्रसिद्ध भेळ यांचा स्टॉल आहे.
सतीश पाबळे हे नामवंत उद्योजक आहेत. ते अत्यंत प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि कर्तृत्ववान आहेत. एक रुपया नफा कमी मिळाला तरी चालेल,परंतु जिजाऊ या नावाची प्रतिष्ठा अबाधित राहिली पाहिजे, हे त्यांचे व्रत आहे. त्यामुळे दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देणे यासाठी ते कटिबद्ध आहेत. या व्यवसायातील त्यांचे सहकारी हितेन पटेल, श्री नाईकवाडे यांचे उत्पादन देखील दर्जेदार आणि लोकप्रिय आहे.
अत्यंत स्वच्छता, नीटनेटकेपणा, पारदर्शकता आणि प्रसन्न वातावरण हे या शॉपचे वैशिष्ट्य आहे. मराठी माणसाला व्यापार जमणार नाही, या अंधश्रद्धेला सतीश पाबळे यांनी मूठमाती दिलेली आहे .आपण देखील जिजाऊ डेअरी मार्टला आवर्जून भेट द्या. नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता ती मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, आणि मिळत नसेल तर उद्योग-व्यवसायात यश मिळवावे, जीवनाचा आनंद घ्यावा. हताश होऊ नये, प्रयत्नवादी असावे. प्रयत्नाने यश मिळते, हे सतीश पाबळे यांनी सिद्ध केलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा