अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा..
आ.बबनदादा शिंदे
..।आ.शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा।।
गावोगावचा विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा व आरोग्यसेवे विषयी दक्ष राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेंबळे।प्रतिनिधी। AJ 24 Taas News Maharashtra
माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावातून आमदार बबनराव शिंदे यांनी गाव भेट दौरा आयोजित करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. गावकर्या समवेत ठीक ठिकाणी भेटी देऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जागेवरच सुचना देउन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. अनेक स्थलांतरित कुटुंबीयांची भेट घेऊन, तहसीलदारांना त्यांना अन्न धान्य पुरवठा करण्याची सोय करण्याचे सांगुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व गोरगरीब कुटुंबांना आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलासा व धीर दिला.
सविस्तर वृत्तांत असा की माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी ,करोळे, उंबरे पागे, सांगवी, जळवली, नांदोरे, आवे ,तरटगाव, देवडे ,खेड भोसे, होळे, चिंचोली भोसे, भटुंबरे, ईश्वर वाठार, देगाव, शेळगाव दुमाला, वाडी कुरोली ,पिराची कुरोली, इत्यादी गावांमधून आमदार बबनदादा शिंदे यांनी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी गावभेट दौरा आयोजित केला होता. त्यांचेबरोबर पंढरपूर तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन लोंढे पाटील,तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी गोडसे ,तालुका कृषी अधिकारी, गावचे तलाठी, ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, वीज मंडळाचे संबंधित अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
या दौऱ्यामध्ये ठीक ठिकाणी झालेल्या गाव भेटीमध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर भीमा नदी काठावरील पूरग्रस्त ठिकाणाची आ. बबनदादांनी पाहणी केली. महापुरामध्ये वाहून गेलेल्या जमिनी, ऊस, फळबागा,चारावैरण व इतर पिके , विद्युत मोटारी, पाईपलाईन ,स्टार्टर तसेच खचलेले रस्ते,पडझड झालेली घरे, गावोगावच्या परीसरातील शिवारातीलमधील ओढे-नाले ,लहान ओहोळ अशा ठीकाणच्या उतारावरील भागातून जमीन वाहून गेलेल्या ठीकाणचे व झालेल्या पिकांचे नुकसान याची आ.शिंदे यांनी पाहणी केली., तसेच शेळ्या मेंढ्या, गाई म्हशींची लहान वासरे यांच्याही मृत्यूची व नुकसानीची पाहणी व चौकशी करून, नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले .काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत तर तारा तुटल्या आहेत या ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्ती करून वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्याविषयी दादांनी सूचना केल्या. तसेच अनेक ठिकाणी बंद पडलेला गावचा पाणीपुरवठा ताबडतोब सुरू करण्याविषयी सूचना दिल्या. नदीकाठच्या अनेक नागरिकांचे पाण्यामुळे संसार उध्वस्त झाले अशा स्थलांतरित नागरिकांना तातडीने अन्नधान्य पुरवण्याच्या सूचना त्यांनी प्रांताधिकार्यांनी केल्या. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या उसात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साठले आहे किंवा जो ऊस पाण्यात बुडालेला आहे अशा उसाची नोंद कारखान्याकडे असेल तर असा ऊस तोडणी करून ताबडतोब गळीतासाठी नेला जाईल असेही आ.बबनदादांनी आवर्जून सांगितले.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी सर्दी ,ताप, खोकला, पडसे वगैरे किंवा इतर काही आजारावर प्रतिबंध करण्याच्या सूचनाही आ.बबनदादा शिंदे यांनी आरोग्य खात्याला केल्या. अगोदरच कोरोनाचे संकट सर्वत्र असताना पुन्हा हे निसर्गाचे संकट आल्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी ,शेतमजूर व गोरगरिबांना आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलासा दिला व या संकटातून खचून जाऊ नका,धीर सोडू नका तुम्हाला निश्चित सर्वतोपरी सहकार्य मिळेल असा विश्वास गावच्या नागरिकांना आमदार शिंदे यांनी दिला.
********


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा