Breaking

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

कुर्डुवाडी रेल्वे वर्कशाॅपला 511 नवीन पदभरती पूर्वाश्रमीचे सोनेरी दिवस...******************************* *वर्कशॉपच्या इतिहासात प्रथमच ५११ नविन पदभरतीने कुर्डुवाडीची बाजारपेठ फुलणार.


*कुर्डुवाडी रेल्वे वर्कशाॅपला  511 नवीन  पदभरती पूर्वाश्रमीचे सोनेरी दिवस...*
******************************
    
*वर्कशॉपच्या इतिहासात प्रथमच ५११ नविन पदभरतीने कुर्डुवाडीची बाजारपेठ फुलणार..*
******************************
*कुर्डुवाडी प्रतिनिधी/अरुण कोरे*

        कुर्डुवाडी शहराचे अस्तित्व व मुख्य आर्थिक वाहीनी असलेल्या रेल्वे वर्कशाॅपमध्ये ५११ नविन पदभरती मंजूर झाली असल्याचे वर्कशाॅपचे प्रभारी प्रभंधक व उपमुख्य यांत्रिक इंजिनिअर संजय एस.साळवे साहेब यांनी पत्रकार परिषदेत दिल्यानै दिवाळीपूर्वीच शहरवासियांमध्ये आनंदाला उधाण आले आहे.

     सदर नविन पदभरतीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजिव मित्तल,मुख्य प्रधान अभियांत्रिकी इंजिनिअर एक.के.गुप्ता, मुख्य कारखाना इंजिनिअर बी.एम.अग्रवाल,परेलचे मुख्य कारखाना प्रबंधक विवेक आचार्य यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे निगर्वी साळवे साहेब यांनी विनम्रतेने स्वत:श्रेय न घेता सांगितले.

        १९३०साली नॅरोगेजसाठी स्थापन झालेल्या कुर्डुवाडी रेल्वे वर्कशाॅप नॅरोगेजचे ब्राॅडगेजमध्ये रुपांतर होण्यापूर्वी १९८३ नंतर नविन पदभरती पूर्णपणे बंद झालेली होती.१२०० हून अधिक कर्मचारी संख्या ३०० पर्यंत खाली आली होती.
     त्यानंतर वर्कशाॅपला चांगलीच घरघर लागली होती.रेल्वेवर्कशाॅप कुर्डुवाडीतून हलविण्याचा घाट घातला जात असताना मध्यंतरी बंद पडतो की काय अशी गंभिर परिस्थिती निर्माण झाली होती.
       त्यानंतर लोकप्रतिनिधीनिंही म्हणावे असे प्रयत्न केले नव्हते.
      रेल्वे वर्कशाॅपच्या कर्मचा-यांनी मात्र रात्रंदिवस मेहनत करून आपले नविन कौशल्य दाखवून दिले होते.
    अपुरे मनुष्यबळ व नविन कौशल्याचा अभाव असतानाही रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिवाचं रान करून नॅरोगेज पीओएचच्या निर्मिती बरोबरच नेरळ माथेरान चे डब्बे तर बनवलेच पण 
 चेन्न्ई-हैद्राबाद येथेच बनणारे "विस्ताडोम" पारदर्शी अत्याधुनिक कोच कुर्डुवाडीत बनवून मध्य रेल्वेत इतिहास घडवला.
       कुर्डुवाडी रेल्वे वर्कशाॅपच्या नूतनीकरणासाठी ६० कोटी पैकी ३२कोटी रुपयांची कामे मंजूर असून उर्वरित २८ कोटींची कामेही प्रगतीपथावर आहेत. तर तीन भव्य शेडचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
      सध्या दरमहा २० पीओएच बनवली जात असून सहा पटीने वाढून कामपूर्णत्वानंतर १२० पी.ओ.एच दरमहा बनवले जाणार असून त्यानंतरही त्यात वाढच होत राहील असे ठामपणे श्री.साळवे साहेब यांनी सांगितले.
      नविन ५११ पदभरतीमध्ये ४८२ इंजिनिअरिंग व २९ लिपिकवर्गिय भरती होणार असून त्यांच्या आर्थिक उलाढालीचा कुर्डुवाडीकरांना चांगलाच फायदा होईल. ही नविन भरती दोन तीन महिन्यांत पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
    विशेष महत्त्वाचे म्हणजे कोरोनोच्या पार्श्र्वभूमीवर जून पासूनच सर्व काळजी घेऊन अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व  काम बंद न ठेवता अव्याहतपणे सुरूच आहे.
    या पत्रकार परिषदेस सहा.प्रबंधक सुनिल कुमार,भांडार प्रमुख किर्तीप्रकाश आर्य, सि.से.इंजि.सर्वश्री व्ही.जी.कुंभार,स्वप्निल शहाणे, अशोक पाटोळे, तमन्ना मब्रुखाने,सहा.पर्यवेक्षक श्रीकांत भांबुरे व वाहीद शेख,विशाल लोभे,मुक्तार शेख, हिंदी विभाग प्रमुख प्रशांत मामा भंडारकवठेकर,सर्व कामगार संघटना,असोसिएशन,कामगार सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा