Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

कासार्डेत अनाधिकृत बांधकाम धारकाने बिन शेती प्लॉटचा रस्ता केला गायब!* *अनाधिकृत बांधकाम ला मिळाली न्यायालयीन स्थगिती**AJ 24 Taas News Maharashtra*


*कासार्डेत अनाधिकृत बांधकाम धारकाने बिन शेती प्लॉटचा रस्ता केला गायब!*

*अनाधिकृत बांधकाम ला मिळाली न्यायालयीन स्थगिती*

*AJ 24 Taas News Maharashtra*
 *सिंधुदुर्ग प्रतिनिधी /उमेश मनोहर शेटये*

 रत्नागिरी दि.२१
 एका अनाधिकृत बांधकाम मुळे कासार्डे येथील मुंबई-गोवा महामार्गलगच्या बिगर शेती जागा मालकाचा महामार्गपर्यंत येण्या-जाण्याचा "३ मीटरचा" रस्ताच गायब झाला आहे. कसाडेॅ तिठा येथे सुरू असलेल्या या संबंधित अनाधिकृत गाळे बांधकामुळे हा रस्ता गायब झाल्याचे संदेश कुडतरकर यांनी माहिती दिली आहे. आपल्या बिनशेती प्लाॅटच्या रस्त्याची जागा बळकाविण्यात व त्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याची तक्रार कासाडेॅतील रहिवाशी व सध्या मुंबई स्थित संदेश दत्तात्रय कुडतरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी सदर अनाधिकृत बांधकामांवर न्यायालयीन स्थगितीही मिळाली आहे.  संदेश कुडतरकर संध्या मुंबईत राहतात. लाॅकडाऊनमुळे ते यावर्षी गावी आले नाहीत, याचा फायदा घेत त्यांच्या बिनशेती प्लाॅटच्या रस्त्याच्या जागेत अनाधिकृत बांधकाम करत असल्याचे त्यांना समजले आपल्या मालकीचा प्लाॅट बिनशेती असुनही आपला १० फुटी रस्ता गायब करित अनाधिकृत बांधकामांचा फटका कोविड-१९ च्या काळात आपल्याला सोसावा  लागला  असे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणी संदेश कुडतरकर यांनी कणकवली येथे कनिष्ठ दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून सदर प्रकरणात स्थगिती आदेश मिळवले आहेत.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा