*सोलापूर जिल्ह्याचा आधारवड कोसळला- विजयसिंह मोहिते पाटील*
.
भावपूर्ण श्रद्धांजली
टेंभुर्णी [प्रतिनिधी- ] aj24taas news mharastr
*******************************************
टेंभुर्णी [प्रतिनिधी] कणखर नेतृत्व हाच समाजाचा आधार असतो श्रीमंत सुधाकर पंत परिचारक यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सहकार क्षेत्रातला आधारवड आज दुर्दैवाने कोसळला असल्याने सोलापूर जिल्ह्याचे व मोहिते पाटील परिवाराचे अपरिमित नुस्कान झाले असल्याचे भावनिक शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी उदगार काढले.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत सुधाकर पंत परिचारक यांच्या आठवणीतील फोटो
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज 18 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात मोजक्या लोकासमावेत अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील धुर्त राजकारणी निर्वतला आहे.
कोरोनाचा वाढता शिरकावा पाहून पंढरपूर पाच ऑगस्ट रोजी त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आलं होतं.
परंतु मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं असल्याचे सांगण्यात आले . अखेर काल रात्री 11वा 40 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकरपंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न होते. पंतांच्या जाण्याने पंढरपूर शहर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सुधाकरपंत परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. एसटी महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांची ओळख होती. अडचणीत असलेल्या अनेक सहकारी संस्थांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बाहेर काढलं. श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसंच मोहोळ तालुक्याती भीमा सहकारी साखर कारखान्याचं अनेक वर्ष नेतृत्त्व केलं होतं.
पुणे येथे कोरोनाच्या नियमावलीत अंत्यविधी पार पडतील, अशी माहिती प्रितीश परिचारक यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा